Beed Crime : भावजयीची छेड काढली म्हणून पीकअपने चिरडून केली हत्या; अपघाताच केला बनाव
Beed Crime News: तीन महिन्यांपूर्वी भावजईचा हात धरून छेडछाड केल्याचा मनात राग होता.
Beed Crime News: बीडच्या (Beed) परळी शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भावजयीची छेड काढली म्हणून पीकअपने चिरडून केली हत्या (Murder) करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे कोणालाही संशय येऊ नयेत म्हणून आरोपीने अपघाताचा (Accident) बनाव केला होता. मात्र पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तापसाचे चक्र फिरवली आणि सर्व प्रकार उघडकीस आला. शहरातील श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलावर हा अपघात झाला होता. तर अपघाताचा बनाव करून हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव राम बाबू पारवे (रा. डाबी, ता. परळी) आहे. तर संपत्ती भारत पारवे असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
परळी शहरातील श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलावर मोटरसायकल व पीकअप वाहनाचा शनिवारी अपघात झाला होता. या अपघातात एकाचा मृत्यू तर एक जखमी झाला होता. मात्र याबाबत पोलिसांना शंका आली आणि त्यांनी तपासाचे चक्र फिरवली. दरम्यान पोलिसांनी केलेल्या अचूक तपासानंतर हा अपघात नसून हत्या असल्याचे तपासात समोर आले. तर तीन महिन्यांपूर्वी भावजईचा हात धरून छेडछाड केल्याचा मनात राग होता, आणि त्याचाच बदला घेण्यासाठी राम पारवे याने अपघात घडवून आणल्याचे तपासात समोर आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास तीन महिन्यांपूर्वी, संपत्ती भारत पारवे याने आरोपी राम पारवे याच्या भावजईच्या हाताला धरून छेड काढली होती. याचा राग आरोपी राम पारवे याच्या मनात होता. त्यामुळे संपत्ती पारवेचा गेम करण्याचा त्याने ठरवले होते. दरम्यान 25 मार्च रोजी संपत्ती पारवे व त्याचा मित्र निकम केरबा एंगडे हे दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास परळीकडून नागापूरकडे जात असताना त्यांच्या मोटारसायकलला पाठीमागून येणाऱ्या पीकअपने जोराची धडक दिली होती. संपत्ती हा खाली पडला असता त्याच्या अंगावरून पुन्हा पीकअप घालून त्याला राम पारवने ठार मारले होते. मात्र त्यानंतर अपघाताचा बनाव केला होता. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात त्याचे बिंग फुटले.
पोलिसांना संशय आला आणि बिंग फुटलं
परळी शहरातील श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलावर मोटरसायकल व पीकअप वाहनाचा शनिवारी अपघात झाला होता. या अपघातात एकाचा मृत्यू तर एक जखमी झाला होता. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मात्र संभाजीनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनेची परिस्थिती पाहून हा अपघात नव्हे तर खूनच असल्याचा संशय व्यक्त केला. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळीची पाहणी केली. पुढे हा खूनच असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले. पोलिसांनी केवळ एका तासातच आरोपी राम पारवेला बेड्या घेऊन ताब्यात घेतले.
इतर महत्वाच्या बातम्या :