मोठी बातमी! कुंडलिक खांडेच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ, बीड न्यायालयाचे आदेश
कुंडलिक खांडे हा पोलिसांच्या ताब्यात आहे. आता आणखी खांडे यांच्या अडचणीत वाढ झालीय. या गुन्ह्यानंतर शिंदे गटाकडून कुंडलिक खांडे याची हकालपट्टी देखील करण्यात आलेली आहे.
बीड : शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंच्या (Kundlik Khande) पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. कथित ऑडिओ क्लिपप्रकरणी (Viral Audio Clip) खांडे सध्या पोलीसांच्या ताब्यात आहेत. बीड (Beed News) न्यायालयाने आदेश दिले आहेत.
शिंदे गटाचे बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेला 307 च्या गुन्ह्यात अटक झाली होती. आज बीड खांडेला न्यायालयात हजर केले असता खांडेच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ झालीय. पोलिसांनी खांडेसाठी पाच दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती. परंतु न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मागील आठवड्यात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या बाबत कथित ऑडिओ क्लिप वायरल झाली होती. आणि त्यानंतर कुंडलिक खांडे चर्चेत आले होते. या ऑडिओ क्लिप नंतर एप्रिल महिन्यात दाखल झालेल्या 307 च्या गुन्ह्यात कुंडलिक खांडेला पोलिसांनी अटक केली मागील चार दिवसांपासून कुंडलिक खांडे हा पोलिसांच्या ताब्यात आहे. आता आणखी खांडे यांच्या अडचणीत वाढ झालीय. या गुन्ह्यानंतर शिंदे गटाकडून कुंडलिक खांडे याची हकालपट्टी देखील करण्यात आलेली आहे.
पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका
कुंडलिक खांडे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण बीड जिल्ह्यात उमटल्याचं पाहायला मिळालं. मागच्या दोन दिवसापासून व्हायरल होत असलेल्या कथेत ऑडिओ प्रकरणामुळे चर्चेत आलेले बीडचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर पक्षाकडून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे बीडच्या राजकारणात जोरदार हालचाली होताना दिसत आहेत. दरम्यान, एबीपी माझा या कथित ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.
काय आहे व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये?
कुंडलिक खांडे यांच्यासोबत एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याची चर्चा चालू असताना निवडणुकीपूर्वीच बजरंग सोनवणे यांना त्यांनी कशी मदत करायची हे सांगतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओतून दोघांमधील संवाद ऐकायला मिळत आहे. तर, दुसरी ऑडिओ क्लिप ही मतमोजणीनंतरची आहे, ज्यामध्ये म्हाळस जवळा या कुंडलिक खांडेंच्या मूळ गावातून पंकजा मुंडेंना मुद्दामून लीड दिली. कारण, ओबीसी मताचा आपल्याला फायदा होऊ शकतो हे सांगत असताना बीड विधानसभा मतदारसंघातील सगळ्या बुथवर कशाप्रकारे बजरंग सोनवणे यांच्यासाठी त्यांनी फिल्डिंग लावल्याचं ते सांगत आहेत. त्यामध्ये, धनंजय मुंडे आणि त्यांचे सहकारी वाल्मिक कराड त्यांच्याबाबतीत बोलत त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याचंही बोलत आहेत.
हे ही वाचा :