एक्स्प्लोर

Karuna Sharma vs Dhananjay Munde : करुणा शर्मांची पुढची चाल, धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात, थेट हायकोर्टात धाव!

Dhananjay Munde vs Karuna Sharma : मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde ) यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. कारण धनंजय मुंडे यांच्याविरोधात आता करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी थेट हायकोर्टात धाव घेतली आहे.

Dhananjay Munde vs Karuna Sharma : छ. संभाजीनगर : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Beed Santosh Deshmukh case) हत्याप्रकरणात विरोधक आणि सत्ताधारी आमदारांच्या रडारवर असलेले राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde ) यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. कारण धनंजय मुंडे यांच्याविरोधात आता करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी थेट हायकोर्टात धाव घेतली आहे. धनंजय मुंडे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात  (Maharashtra Election) माहिती लपवल्याचा आरोप आहे. धनंजय मुंडेंनी पहिल्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता आणि कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची माहिती लपवली असल्याचा आरोप करत करुणा शर्मा यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेले मंत्री धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.  

करुणा शर्मांच्या याचिकेत नेमकं काय? 

धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध करुणा शर्मा यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यांनी केलेल्या याचिकेत धनंजय मुंडे यांनी भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकल्याचा आरोप केला आहे. धनंजय मुंडेंनी पहिल्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता आणि कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची माहिती लपवली असल्याचा आरोप करुणा शर्मा यांचा आहे. 

करुणा शर्मांचे वकील काय म्हणाले? 

करुणा शर्मांचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "दिनांक 4 जानेवारी 2025 रोजी करुणा मुंडे  यांचा फॉर्म 30-10-2024 ला चुकीच्या मार्गाने फेटाळला होता.  त्याविरोधात आणि धनंजय मुंडे यांची जी निवड झालीय ती करप्ट प्रॅक्टिस आहे. त्यामुळे आम्ही करुणा मुंडे मार्फत उच्च न्यायालयात एक इलेक्शन पिटीशन दाखल केली आहे.  त्यामध्ये आमचे प्रमुख मुद्दे आहेत की धनंजय मुंडे यांनी आपल्या पहिल्या पत्नी जी कायदेशीर पत्नी असून, तिचा कुठे उल्लेख केलेला नाही. 

तिच्या प्रॉपर्टी संदर्भात कुठलाही उल्लेख केलेला नाही. फक्त तिच्याकडून झालेली दोन मुलं, त्याचा उल्लेख केलेला आहे.  त्या दोघांमध्ये ज्या केसेस पेंडिंग आहेत, मुंबई, संभाजीनगर, पुणे आणि बऱ्याच ठिकाणी त्याचा कुठे उल्लेख केला नाही. 

ही सगळी माहिती त्यांनी लपवून ठेवलेली आहे. कायद्याप्रमाणे जर निवडणूक फॉर्म भरताना कुठली माहिती लपवून ठेवली तर त्याला सहा महिन्याची शिक्षा होऊ शकते.  त्याला पुराव्याची गरज नाही. कारण सगळी कागदपत्रे पुरावे आमच्याकडे आहेत"

संतोष देशमुख हत्याप्रकरणात खास माणूस अटकेत

दरम्यान, बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडे यांचा खास माणूस असलेला वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली आहे. वाल्मिक कराडवर खंडणी मागितल्याचा आरोप आहे.  संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड, विष्णू चाटे यांच्यासह पाच जणांना अटक झाली आहे.

सरपंच देशमुख हत्या प्रकरणात सुरुवातीला केज पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर आणखी दोन आरोपींचा यात समावेश करण्यात आला आहे. या घटनेत सरपंच देशमुख याला झालेल्या मारण्यात तब्बल 56 जखमा अंगावर आढळून आल्या. ज्यात एक गॅसचा पाईप त्याची लांबी 41 इंच होती.  

9 डिसेंबरला केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं आणि नंतर त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. 

संबंधित बातम्या

Anjali Damania: धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडांच्या अडचणी वाढल्या; अंजली दमानियांच्या मुख्यमंत्र्यांकडे 10 मागण्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik News : लग्नघरी कोसळला दुखाचा डोंगर, वराच्या आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, मुलासोबत जेवण केलं अन् दोघांनी...; नाशिक हादरलं!
लग्नघरी कोसळला दुखाचा डोंगर, वराच्या आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, मुलासोबत जेवण केलं अन् दोघांनी...; नाशिक हादरलं!
लेक आर्यन खानचा ब्रँड प्रमोट करताना शाहरुख खानकडून मोठी चूक, जगातील सर्वात प्रसिद्ध पेंटिगचा अपमान
लेक आर्यन खानचा ब्रँड प्रमोट करताना शाहरुख खानकडून मोठी चूक, कलाप्रेमींचा अपमान
Market Yard: मार्केटयार्डात नंदुरबारी मिरच्यांचा एकच ठसका, 500 हून अधिक गाड्या आल्या, किती मिळतोय भाव?
मार्केटयार्डात नंदुरबारी मिरच्यांचा एकच ठसका, 500 हून अधिक गाड्या आल्या, किती मिळतोय भाव?
Dhananjay Munde: मी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिलेला नाही; धनंजय मुंडेंनी ठामपणे सगळंच सांगून टाकलं
धनंजय मुंडेंच्या देहबोलीतील कॉन्फिडन्स कायम, ठाम स्वरात म्हणाले, 'काहीही मंत्रि‍पदाचा राजीनामा वगैरे दिलेला नाही'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 11 AM 07 January 2025 सकाळी 11 च्या हेडलाईन्सSanjay Raut Delhi : अजित पवार हे अ‍ॅक्सिडेंटल नेते..संजय राऊत यांची सडकून टीका #abpmajha100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 7 Jan 2025ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 07 January 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik News : लग्नघरी कोसळला दुखाचा डोंगर, वराच्या आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, मुलासोबत जेवण केलं अन् दोघांनी...; नाशिक हादरलं!
लग्नघरी कोसळला दुखाचा डोंगर, वराच्या आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, मुलासोबत जेवण केलं अन् दोघांनी...; नाशिक हादरलं!
लेक आर्यन खानचा ब्रँड प्रमोट करताना शाहरुख खानकडून मोठी चूक, जगातील सर्वात प्रसिद्ध पेंटिगचा अपमान
लेक आर्यन खानचा ब्रँड प्रमोट करताना शाहरुख खानकडून मोठी चूक, कलाप्रेमींचा अपमान
Market Yard: मार्केटयार्डात नंदुरबारी मिरच्यांचा एकच ठसका, 500 हून अधिक गाड्या आल्या, किती मिळतोय भाव?
मार्केटयार्डात नंदुरबारी मिरच्यांचा एकच ठसका, 500 हून अधिक गाड्या आल्या, किती मिळतोय भाव?
Dhananjay Munde: मी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिलेला नाही; धनंजय मुंडेंनी ठामपणे सगळंच सांगून टाकलं
धनंजय मुंडेंच्या देहबोलीतील कॉन्फिडन्स कायम, ठाम स्वरात म्हणाले, 'काहीही मंत्रि‍पदाचा राजीनामा वगैरे दिलेला नाही'
Sanjay Raut : अजित पवार अ‍ॅक्सिडेंटल नेते, त्यांच्यात हिंमत असती तर...; बीड प्रकरणावरून संजय राऊतांचा बोचरा वार, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
अजित पवार अ‍ॅक्सिडेंटल नेते, त्यांच्यात हिंमत असती तर...; बीड प्रकरणावरून संजय राऊतांचा बोचरा वार, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
Jalgaon Crime : जळगावातील 'त्या' हॉटेलमध्ये पोलिसांनी डमी गिऱ्हाईक पाठवला अन् वेश्या व्यवसायाचं बिंग फुटलं, नेमकं काय घडलं?
जळगावातील 'त्या' हॉटेलमध्ये पोलिसांनी डमी गिऱ्हाईक पाठवला अन् वेश्या व्यवसायाचं बिंग फुटलं, नेमकं काय घडलं?
आता राज्यातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये मोबाईलवर बंदी! वाघिणीसह 5 बछड्यांना घेरल्यानंतर हायकोर्टाची कठोर भूमिका
आता राज्यातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये मोबाईलवर बंदी! वाघिणीसह 5 बछड्यांना घेरल्यानंतर हायकोर्टाची कठोर भूमिका
सरकारच्या तिजोरीवर 'ताण'! 'लाडक्या बहिणींना' निकषांच्या चाळणीमध्ये ढकलण्याचे उद्योग, सामना अग्रलेखातून सरकारवर जहरी टीका
सरकारच्या तिजोरीवर 'ताण'! 'लाडक्या बहिणींना' निकषांच्या चाळणीमध्ये ढकलण्याचे उद्योग, सामना अग्रलेखातून सरकारवर जहरी टीका
Embed widget