Beed Lok Sabha Constituency : ज्योती मेटेंची लोकसभा लढवण्याची घोषणा, थेट पंकजा मुंडेंशी होणार सामना
Lok Sabha Election 2024 : कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवायची किंवा अपक्ष उमेदवारी दाखल करायची याबाबत दोन दिवसात ज्योती मेटे निर्णय घेण्याची शक्यता आहे.
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर चर्चेत आलेल्या विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या पत्नी ज्योती मेटे (Jyoti Mete) यांनी अखेर लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ज्योती मेटे यांनी शासकीय नोकरीचा राजीनामा (Resignation From Government Job) दिला असून, लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची अधिकृत भूमिका त्यांनी आज स्पष्ट केली आहे. तसेच याबाबत आपण लवकरच आपली भूमिका जाहीर करणार असल्याचं देखील ज्योती मेटे यांनी म्हटले आहे. त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघातून (Beed Lok Sabha Constituency) पंकजा मुंडे (Pankaja Munde) विरुद्ध ज्योती मेटे असाच सामना रंगणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.
महविकास आघाडीच्या माध्यमातून बीड लोकसभा निवडणुकीसाठी ज्योती मेटे यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, ज्योती मेटे महविकास आघाडीकडून निवडणूक लढतील की अपक्ष लढतील यात संभ्रम आहे. ज्योती मेटे यांनी आज शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेतली. यात लोकसभा निवडणुकीवरून चर्चा करण्यात आली. कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवायची किंवा अपक्ष उमेदवारी दाखल करायची याबाबत दोन दिवसात ज्योती मेटे निर्णय घेण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी आपण ठाम असल्याचे मेटे यांनी म्हटले आहे.
ज्योती मेटे कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार?
ज्योती मेटे महाविकास आघाडीकडून बीडमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. यासाठी त्या शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या देखील बातम्या आल्या होत्या. दरम्यानच्या काळात त्यांनी शरद पवारांची भेट देखील घेतली होती. मात्र, असे असतानाच ज्योती मेटे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली आहे. शिवसंग्राम हा महायुतीचा घटक पक्ष आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असलेल्या ज्योती मेटे कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार किंवा अपक्ष मैदानात उतरणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
जातीय समीकरणे महत्वाचे ठरणार?
बीड लोकसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत जातीय समीकरणे महत्वाचे ठरणार असल्याची चर्चा आहे. पंकजा मुंडे यांच्याकडे ओबीसी नेत्या म्हणून पाहिले जाते. तसेच विनायक मेटे यांचे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठं योगदान आहे. त्यातच मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा सध्या मराठा आंदोलनाचा केंद्र बिंदू बनला आहे. त्यामुळे ओबीसी विरुद्ध मराठा असे जातीय समीकरण देखील लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघात पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
बीडमध्ये शरद पवारांचा नवा डाव, धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयाला पंकजाताईंच्या विरोधात मैदानात उतरवणार