Suresh Dhas: "करूणा मुंडेंच्या कारमध्ये पिस्तुल ठेवणारा व्यक्ती...", सुरेश धस यांचा मोठा गौप्यस्फोट, नेमकं काय म्हणाले?
Suresh Dhas: या प्रकरणाच्या संबंधित पोलिसांची आणि अधिकाऱ्यांची नावे मी लवकरच मुख्यमंत्र्यांना देणार आहे, तर कारवाईची मागणी करणार असल्याचंही यावेळी धस यांनी सांगितलं आहे.
बीड: संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील तपास पथकात काही लोकांची बदली ही वाल्मिक कराड यांनी केली होती, म्हणून आम्ही त्यांची नावे घेतली आहेत. गडचिरोलीतील एकाची बदली वाल्मिक कराड यानी करून आणलेले आहे. गडचिरोलीतील बदली करून आणलेल्याने त्याची स्वामिनिष्ठा त्याने दाखवू नये. काही लोक अतिशय संपर्कात आहेत. ते देखील पुढे आलं आहे. त्याचबरोबर करूणा मुंडे यांच्या गाडीमध्ये पिस्तुल ठेवणारी व्यक्ती देखील दुसरी, तिसरी कोणी नसून ती बीड जिल्ह्यातील पोलिस दलातील व्यक्ती होती. त्याचे नाव देखील मला माहिती आहे. मात्र, ते बाहेर मी सांगणार आहे. मी एसपींना सांगेन. पोलिस दलामध्ये असे काही लोक असतील तर चार ते पाच लोकांवर काही आक्षेप नाही. मात्र, खालचे काही पोलिस आणि अधिकारी आहेत, त्यांच्यावरती आक्षेप आहे, त्यांच्याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सांगितलं आहे, ते बोलले त्याबाबतची सर्व माहिती काढा, मी ती सर्व माहिती घेऊन मी त्यांच्याकडे जाणार आहे, अशी माहिती देखील यावेळी बोलताना सुरेश धस यांनी म्हटलं आहे.
नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा
करूणा मुंडे यांच्या कारमध्ये पिस्तुल आकाच्या सांगण्यावरून तो पिस्तुल ठेवण्यात आलेला होता. यावरून त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता. काही दिवस त्या जेलमध्ये होत्या, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी माध्यमांना दिली आहे. पोलीस दलात बिंदू नामावली प्रमाणे माहिती घेण्यासाठी पत्र दिले आहे. बिंदू नामावलीप्रमाणेच जिल्ह्यात कर्मचारी राहणार अशी मागणी त्यांनी केली आहे. नैतिकताच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत किंवा चार्जशीट दाखल होईपर्यंत त्यांनी पदावर राहावं असं मला वाटत नाही, एकतर त्यांनी विना खात्याचे मंत्री राहावे किंवा अजित पवारांनी त्यांना काही दिवस मंत्री पदापासून बाजूला करावे असे मला वाटते, आणि ही सर्व जनतेची भावना आहे असंही पुढे सुरेश धस म्हणाले आहेत.
एकतर धनंजय मुंडे यांनी विना खात्याचे मंत्री राहावे किंवा अजित पवारांनी त्यांना काही दिवस मंत्री पदापासून बाजूला करावे असे मला वाटते, त्याचबरोबर जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होत आहेत, काल कोणीतरी हॉस्पिटलच्या बाहेर कॉट आणून टाकले ते पोलिसांसाठी आणलेले हे कॉट आरोपींसाठी आणलेले वाटले. हे इतकं भयानक आहे, त्यातल्या त्यात हे सोशल मीडियामुळे लोकांपर्यंत वेगळा मेसेज आणि चुकीचा मेसेज जात आहे. म्हणून आता आमचं म्हणणं आहे, मात्र त्यांनी करायचं की नाही हा त्यांचा निर्णय आहे, तो राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय आहे. भाजपचा यामध्ये काही निर्णय घ्यायचा संबंध नाही, आमच्या मुख्यमंत्र्यांचा त्याच्याशी संबंध नाही असंही पुढे सुरेश धस यांनी स्पष्ट केला आहे.
बीडमध्ये बऱ्याच शिफारसी चालल्या. माजी पालकमंत्री आणि माजी कृषीमंत्र्याच्या सांगण्यावरून आकाने अनेक शिफारसी केल्या, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शिफारसी चालल्या. आम्ही याबाबतची मागणी मुख्यमंत्र्याकडे करणार आहोत. काही लोक वगळता बाकी नावे बदलू शकतात, आम्ही ती नावे बदलण्यासाठी मुख्यमंत्र्याकडे मागणी करणार आहोत. सुदर्शन घुले याचे कोणासोबत फोटो आहेत, ते तुम्ही पाहिलेले आहेत, अतिशय जवळचा कार्यकर्ता आहे. मला वाटतं विष्णू चाटे याला सुदर्शन घुलेकडून क्रॉस करण्यासाठी आपण काहीतरी भयंकर प्रकरण करावं आणि वाल्मिकच्या मनात घर करावं, असा सुद्धा मारहाणीचा आणि खून करण्याचा तो प्रकार आहे असं मला वाटतं, एका गॅंग मध्ये दोन गॅंग बनण्याचा प्रकार असावा असं मला वाटतं असंही पुढे धस म्हणालेत.