धन्या म्हणून हिणवलं, शिव्या शाप दिला, दगड मारले पण..: धनंजय मुंडे
Dhananjay Munde : धन्या म्हणून हिणवलं, शिव्या शाप दिला, दगड मारले, पण मी माझी नियत ढळू दिली नाही, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी हा किस्सा सांगितला.
Beed News : कधीकाळी ज्या ठिकाणी मोठा राजकीय विरोध झाला, त्याच ठिकाणी एखाद्या नेत्याला त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून विकास काम करण्याची संधी मिळणे हे एखाद्या चित्रपटात शोभेल अशी कहाणी आहे. मात्र, हे चित्रपटातील सीन नसून महाराष्ट्रातील एका राजकीय नेत्याच्या आयुष्यातील खरोखरचं इतिहास आहे. सध्याचे राज्याचे कृषिमंत्री असलेले धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आपल्या आयुष्यातील हा इतिहास सर्वांसमोर मांडला. धन्या म्हणून हिणवलं, शिव्या शाप दिला, दगड मारले, पण मी माझी नियत ढळू दिली नाही, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी हा किस्सा सांगितला.
बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातल्या एका विकास कामाचा भूमिपूजन धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, "गेल्या दहा वर्षांपूर्वी याच शिरूर तालुक्यात येण्यासाठी मला अनेकांनी शिव्या, शाप दिला, दगड मारले. एवढंच नाही तर धन्या म्हणून हीणवलं. पण मी माझी नियत ढळू दिली नाही. संत महातांच्या आशीर्वादामुळेच आज मला या गडाची पायरी होता आलं. शिरूर तालुक्याची निर्मिती गोपीनाथ मुंडे साहेबांनी केली आहे आणि या तालुक्याचा विकास व्हावा हे त्यांचे स्वप्न होतं. त्यामुळे ऊसतोड मजूर असलेला कलंक पुसून आता प्रत्येकाला ऊस उत्पादक शेतकरी बनवायचं स्वप्न पूर्ण करणार असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले आहेत.
राजकीय आयुष्यातील जुन्या क्षणाची आठवण
बीडचे पालकमंत्री तथा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते शिरूर तालुक्यातल्या लोणी गावात प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत संत खंडोबा बाबा मंदिर संस्थांच्या विकास कामासाठी 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याच विकास कामाच्या उद्घाटनासाठी धनंजय मुंडे आले होते. मात्र, यावेळी त्यांना आपल्या राजकीय आयुष्यातील काही जुन्या क्षणाची आठवण झाली आणि त्यांनी आपल्या भाषणातून त्याचा उल्लेख केला.
सुमारे 4 कोटी 20 लाख रुपयांच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन
शिरूर तालुक्यातील कासार येथील संत खंडोजी बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह तसेच पर्यटन विकास योजनेंतर्गत संत खंडोजी बाबा देवस्थान येथे करण्यात येत असलेल्या सुमारे 4 कोटी 20 लाख रुपयांच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन समारंभास आयोजित करण्यात आला होता. यावेळी धनजय मुंडे यांनी उपस्थित राहून उपस्थित भविकांशी संवाद साधला. या निधीतून देवस्थान परिसरात सभामंडप, भव्य भक्त निवास, पेव्हर ब्लॉकिंग, उद्यान, सुशोभीकरण आदी विकासकामे करण्यात येणार आहेत. बीड जिल्हा हा मागास व ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, येथे शाश्वत विकासाच्या माध्यमातून जल संपन्नता आणून ऊसतोड कामगारांचा जिल्हा ते ऊस उत्पादकांचा जिल्हा अशी ओळख विकसित करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत राहू, असा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला.
इतर महत्वाच्या बातम्या: