Pravin Darekar : एक दोन मतं इकडं तिकडं झाली असती तर संजय राऊतांची दांडी गुल झाली असती, प्रवीण दरेकरांचा टोला
संजय राऊत यांनी आठवडाभर तरी आपली बडबड बंद करावी. आमचा तिसऱ्या क्रमांकाचा नेता संजय राऊत यांच्या पेक्षा जास्त मत घेतो, असे वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलं.
Pravin Darekar on Sanjay Raut : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) हे सद्या बीड जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आठवडाभर तरी आपली बडबड बंद करावी, आमचा तिसऱ्या क्रमांकाचा नेता संजय राऊत यांच्या पेक्षा जास्त मत घेतो. त्याची लाज शरम बाळगावी असा टोला दरेकरांनी त्यांनी लगावलाय. आणखी काही मतं इकडे तिकडे झाली तर संजय राऊत यांची दांडी गुल झाली असती असंही दरेकर यावेळी म्हणाले.
पंकजा मुंडेंच्या समर्थकांची घोषणाबाजी
विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्यामुळं पंकजा मुंडे यांचे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. मराठवाड्यातील विविध भागात अनेक ठिकाणी ही अस्वस्थता दिसून येत आहे. आज उस्मानाबाद बीड सीमेवर असाच प्रकार घडला. भाजप नेते प्रवीण दरेकर आज बीड दौऱ्यावर असताना पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी त्यांच्या गाडीचा ताफा अडवला. पंकजा ताईंच्या नावाने हे कार्यकर्त्ते घोषणाबाजी करत होते. यामुळं काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. प्रवीण दरेकर यांनी गाडीतून उतरुन या कार्यकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस देखील हजर झाले. त्यानंतर घोषणाबाजी करत हे कार्यकर्ते निघून गेले.
एका जत्रेनं देव म्हतारा होत नाही, मेटेंचा सन्मान केला जाईल
संजय राऊत बाष्फळ बडबड करत असतात, त्यांनी बडबड बंद करावी असे दरेकर म्हणाले. विनायक मेटे संयमी नेते आहेत. त्यांचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध चांगले आहेत. एका जत्रेनं देव म्हतारा होत नसल्याचे दरेकर यावेळी म्हणाले. मेटे यांचा सन्मान नक्कीच पक्ष करेल असे दरेकर म्हणाले. राज्यातील जनता राज्य सरकारच्या कारभारावर नाराज आहे. ज्या आमदारांनी भाजपला मतदान केले ते या राज्यातील जनतेचे प्रतिनिधीत्व करत आहेत. राज्यातील जनतेच्या भावना व्यक्त झाल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे कल्पक नेतृत्व आहेत. फडणवीसंच्या गणिमी काव्याचा अनुभव आला आहे. आमचा तिसरा उमेदवार निवडून आला. सत्ताधाऱ्यांच्या विषयी असणारी नाराजी समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या: