बीडमध्ये अण्णांचा दबदबा कायम, राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वाढदिवसाच्या बॅनर्सवर वाल्मिक कराडचा फोटो
या बॅनर वर उपमुख्यमंत्री अजित पवार,धनंजय मुंडे,मंत्री पंकजा मुंडे मंत्री छगन भुजबळ,महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या रांगेत आरोपी वाल्मीक कराडचा फोटोही लावला होता

Beed: वाढत्या गुन्हेगारीमुळे चर्चेत असणाऱ्या बीड जिल्ह्यात कधी काय घडेल याचा नेम नाही. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात क्रमांक एकचा आरोपी असणाऱ्या वाल्मिक कराडची दहशत शहराला नवी नाही. वाल्मिक कराड मकोका अंतर्गत कारागृहात असला तरी बीडमध्ये त्याचा दबदबा कायम असल्याचंच चित्र आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सरचिटणीस बाबासाहेब घुगे यांना वाढदिवसानिमित्त देण्यात आलेल्या शुभेच्छांच्या बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री धनंजय मुंडे ,मंत्री पंकजा मुंडे, मंत्री छगन भुजबळ ,महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या दिग्गजांच्या रांगेत चक्क सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा फोटो असलेले बॅनर बीडमध्ये झळकल्यानं मोठी खळबळ उडाली आहे . (Walmik Karad)
नक्की घडलं काय?
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात क्रमांक एकचा आरोपी असणारा आणि अजित पवार गटाचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय मानला जाणारा वाल्मिक कराड जरी मकोका अंतर्गत कारागृहात आहे. तरी बीडमध्ये अजित पवार गटाच्या 'वाल्मिकप्रेमी ' कार्यकर्त्यांनं वाढदिवसाच्या बॅनरवर शुभेच्छांच्या फोटोमध्ये वाल्मिक कराडचा फोटोही ठेवला . राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस बप्पासाहेब घुगे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकांनी केलेल्या बॅनरबाजी हा प्रकार घडला .हे सर्व बॅनर अनधिकृत पणे लावले गेले होते .याची तोंडी तक्रारी येतात काही तासात प्रशासनाने हे बॅनर काढले . विशेष म्हणजे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड हा राष्ट्रवादीच्या कोणत्याही पदावर नाही .मात्र त्याचा दरारा जिल्ह्याच्या पक्ष संघटनेत कायम असल्याचे दिसून आले आहे .
बप्पासाहेब घुगेंच्या वाढदिवसाच्या बॅनरवर वाल्मिक कराड
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचच्या सुनावणीत आरोपी वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी दोष मुक्तीचा साधा अर्ज केला .दरम्यान वाल्मिक कराडच्या सुटकेचं राष्ट्रवादी अजित पवार गटातील कार्यकर्त्यांना स्वप्न पडू लागलं की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे . बप्पासाहेब घुगे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस आहेत . त्यांच्या वाढदिवसानिमित्त समर्थकांनी बीड शहरात बॅनरबाजी केली .या बॅनर वर उपमुख्यमंत्री अजित पवार,माजी मंत्री धनंजय मुंडे,मंत्री पंकजा मुंडे मंत्री छगन भुजबळ,महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या रांगेत चक्क सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडचा फोटोही लावला होता.हे सर्व बॅनर अनधिकृत पणे लावण्यात आल्याची तोंडी तक्रारी येतात प्रशासनाने हे बॅनर काढले .
हेही वाचा:






















