एक्स्प्लोर

बीडजवळ भीषण अपघात, कारची लक्झरी बसला धडक; 15 वर्षीय मुलासह वडील ठार

बीडच्या पाटोदा शहराजवळ पुण्याहून केजकडे जाणारी भरधाव वेगातील कार पुलाच्या कठड्याला धडकून ट्रॅव्हल्सवर जाऊन आदळली.

बीड : राज्यातील रस्ते अपघाताचे (Accident) प्रमाण गेल्या काही वर्षात वाढल्याचे पाहायला मिळत असून केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी देखील याबाबत चिंता व्यक्त केली होती. वर्तमानपत्रात किंवा माध्यमांमध्ये सातत्याने अपघाताच्या बातम्या येत असून महामार्गावरच हे अपघात घडत असल्याचे दिसून येते. आता, बीड (Beed) जिल्ह्यातील पाटोद्याजवळ एका भीषण अपघातात वडिल आणि मुलाचा दुर्दैवी अंत झाला आहे. दरम्यान, दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. 
  
बीडच्या पाटोदा शहराजवळ पुण्याहून केजकडे जाणारी भरधाव वेगातील कार पुलाच्या कठड्याला धडकून ट्रॅव्हल्सवर जाऊन आदळली. या अपघातात अश्फाक शेख (40 वर्षे) आणि त्यांचा मुलगा अल्ताफ शेख (15 वर्षे) हे दोघेही जागीच ठार झाले आहेत. पुण्यावरुन हे दोघेही आपल्या गावी म्हणजेच केजकडे येत होते. मात्र, पाटोदाजवळ आले असता त्यांच्या कारचा अपघात झाला. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ती कार पुलाच्या कठड्याला धडकली. त्यानंतर तीन पलट्या खाऊन समोरून येणाऱ्या एका खासगी कंपनीच्या ट्रॅव्हल्सवर जाऊन आदळली. त्यात कारमधील दोघांचाही मृत्यू झाला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पाटोदा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत कारमधून मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर, मृतदेह पाटोदा ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत. 

सोलापुरात लक्झरी बस जळून खाक 

सोलापूर-पुणे हायवेवरती हैदराबादकडून मुंबईकडे निघालेली लक्झरी बस अचानक पेटून जळून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. बेस्ट एक्सप्रेस नावाची लक्झरी बस नं .NL 01 B 1824 ही हैदराबादकडून मुंबईकडे जात असताना चालू वाहनाने अचानक पेट घेतला. यावेळी स्थानिक व पोलिसांनी सतर्कता दाखवत गाडीतील प्रवाशांना तातडीने खाली उतरवले आणि अग्निशमक बोलवून आग विझवण्यास सुरुवात केली. दोन तासाच्या प्रयत्नानंतर आग विझली. मात्र, तोपर्यंत ही लक्झरी बस संपूर्णपणे जळून गेली होती. यात प्रवाशांचे प्राण वाचवण्यात पोलिसांना यश आले असले तरी गाडीच्या डीकीमधील बॅगा, मोबाईल, लॅपटॉप, आंबे, खाण्याचे साहित्य, मसाल्याचे वस्तू कपडे इत्यादी साहित्य पूर्णपणे जळून गेले आहे. ही बस हैदराबादची असून पोलीस या बसचा चालक अब्दुल इम्तियाज याच्याकडे चौकशी करीत आहेत. 

हेही वाचा

मोठी बातमी : मुंबईत फटाक्यांवर बंदी, भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Amol Khune : 'मी निर्दोष सुटलो तर जरांगेचा टकमक टोकावरून कडेलोट करावा'; मनोज जरांगेंचे सहकारी अमोल खुणे यांच्या थेट इशारा, म्हणाले...
'मी निर्दोष सुटलो तर जरांगेचा टकमक टोकावरून कडेलोट करावा'; मनोज जरांगेंचे सहकारी अमोल खुणे यांच्या थेट इशारा, म्हणाले...
. धक्कादायक! घरात लग्नाची लगबग आणि आनंदाचे वातावरण, रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल 
. धक्कादायक! घरात लग्नाची लगबग आणि आनंदाचे वातावरण, रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल 
बीडमधील मस्साजोगच्या सरपंचपदाची पोटनिवडणूक होणारच, बिनविरोध नाही; अश्विनी देशमुखांवरुद्ध राजकीय संघर्ष अटळ
बीडमधील मस्साजोगच्या सरपंचपदाची पोटनिवडणूक होणारच, बिनविरोध नाही; अश्विनी देशमुखांवरुद्ध राजकीय संघर्ष अटळ
मोठी बातमी : केस पिकले, शरीर थकले, प्रकृती बिघडली; रुग्णालयात नेताना वाल्मिक कराडचं नव रुप समोर Video
मोठी बातमी : केस पिकले, शरीर थकले, प्रकृती बिघडली; रुग्णालयात नेताना वाल्मिक कराडचं नव रुप समोर Video

व्हिडीओ

PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी
PM Modi on Women Reservation Bill : काँग्रेसने त्यांचं अस्तित्व गमावलं तुफान हल्लाबोल
PM Modi on Women Reservation Bill : नारीशक्ती विधेयक नामंजूर, पंतप्रधान मोदींनी मागितली माफी
Sanjay Raut PC : 'मोदी हैं तो नामुमकिन हैं' अशी परिस्थिती, राऊतांचा हल्लाबोल
Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crude Oil in India : जगाला चकवा देत जया, डोरना आणि फेलिसिटी भारतात दाखल, हॉर्मुझमधून 60 लाख बॅरेल इराणी तेल देशात
जगाला चकवा देत जया, डोरना आणि फेलिसिटी भारतात दाखल, हॉर्मुझमधून 60 लाख बॅरेल इराणी तेल देशात
AI In Power Sector : वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
Iran War Live Update: अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
Iran War Live Update: 'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
Pat Cummins: वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
Rahul Gandhi on Women's Reservation Bill: राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
Priyanka Gandhi on BJP: संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
Embed widget