Beed News : जमावाने फोडलेल्या 61 बसेसच्या काचा बसवण्याचे काम सुरु; थेट हिमाचल प्रदेशमधून मागवल्या काचा
ST Bus : वीस लाखांच्या काचा हिमाचल प्रदेशमधून मागवण्यात आल्या आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बसेचीच मागणी पाहता तत्काळ दुरुस्तीचे कामे हाती घेण्यात आली आहे.
बीड : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरु असलेल्या आंदोलनाला बीड जिल्ह्यात हिसंक वळण लागल्याने मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि जाळपोळ झाल्याचे समोर आले होते. याचवेळी बीड शहरातील बस स्थानकावर उभ्या असलेल्या अनेक बसेसची तोडफोड करण्यात आली होती. त्यामुळे, बीडमध्ये जमावाने फोडलेल्या 61 बसेसच्या काचा बसवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. यासाठी वीस लाखांच्या काचा हिमाचल प्रदेशमधून मागवण्यात आल्या आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बसेचीच मागणी पाहता तत्काळ दुरुस्तीचे कामे हाती घेण्यात आली आहे.
बीडमध्ये मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून जमावाने राजकीय नेत्यांचे कार्यालय आणि घरांची जाळपोळ केली होती. सोबतच, बीड बसस्थानकात उभा असलेल्या 61 एसटी बसेसच्या काचा पूर्णपणे फोडल्या होत्या. त्यामुळे, राज्य परिवहन मंडळाचे 20 लाख रुपयांचे नुकसान झाले होते. तर, एसटी बस बंद करण्याचा निर्णय देखील घेण्यात आले होते. मात्र, आता परिस्थिती पूर्वपदावर आल्याने एसटीची सेवा ही पुन्हा सुरू करण्यात आली आहे. तर, जमावाने फोडलेल्या 61 बसेसच्या काचा बसवण्याचे काम युद्धपातळीवर बीडमध्ये असलेल्या एसटीच्या कार्यशाळेत सुरू आहे. यासाठी 20 लाख रुपयांच्या काचा हिमाचल प्रदेशमधून मागविण्यात आल्या आहेत.
25 बसेसच्या काचा बसून वेगवेगळ्या आगारात पाठवण्यात आले
दिवाळीचा सण तोंडावर आले असतानाच बीडमध्ये मोठ्या प्रमाणात एसटी बसेसचे नुकसान झाले होते. त्यामुळे, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुढील पाच दिवसांमध्ये या सर्व बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल करण्यासाठी परिवहन मंडळाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. यापैकी 25 बसेसच्या काचा बसून वेगवेगळ्या आगारात पाठवण्यात आले आहेत. तसेच, उर्वरित बसेसचे काम देखील युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी कामगारांसह चालक आणि वाहक देखील या दुरुस्तीच्या कामात मदत करत आहेत.
परिस्थिती पूर्वपदावर...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला बीड जिल्ह्यात 30 ऑक्टोबर रोजी हिंसक वळण लागले. आमदार प्रकाश सोळुंके आणि संदीप क्षीरसागर यांचे घर पेटवून देण्यात आले. सोबतच माजलगाव नगरपरिषद सुद्धा पेटवण्यात आली. त्यानंतर अनेक एसटी बसेस आणि खाजगी गाड्यांची तोडफोड, जाळपोळ करण्यात आली. या सर्व हिसंक घटना पाहता प्रशासनाने जिल्ह्यात संचारबंदी लागू केली होती. सोबतच इंटरनेट सेवा सुद्धा बंद करण्यात आली होती. त्यामुळे सर्वत्र तणावाचे वातावरण पाहायला मिळत होते. पण आता परिस्थिती पूर्वपदावर येतांना दिसत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Beed Maratha Protest : बीडच्या जाळपोळीच्या घटनेचा मास्टरमाईंड कोण? जयदत्त क्षीरसागर यांचा सवाल