एक्स्प्लोर

Beed Maratha Protest : बीडच्या जाळपोळीच्या घटनेचा मास्टरमाईंड कोण? जयदत्त क्षीरसागर यांचा सवाल

Maratha Reservation : बीडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंखे आणि संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांच्या घरावर हल्ला करण्यात आला होता. या घटनेमागे राजकीय विरोधक असल्याचा आरोप करण्यात येतोय. 

बीड: मराठा आंदोलनाच्या (Maratha Reservation Protest) दरम्यान झालेल्या बीडमधील (Beed) जाळपोळी आणि दगडफेकीमध्ये आमदारांच्या घरावर लक्ष करण्यात आलं, मात्र यामागे एक षडयंत्र असून या षडयंत्राचा मास्टरमाईंड कोण हे तपासा अशी मागणी ओबीसी नेते जयदत्त क्षीरसागर (Jaydatta Kshirsagar) यांनी केली आहे. बीडच्या जाळपोळ प्रकरणात आतापर्यंत 120 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. विशेष म्हणजे या तपासामध्ये पाच अल्पवयीन मुलांनासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

हातामध्ये दगड, काट्या आणि ज्वलनशील पदार्थ घरावर पेटवून दंगा करणारे हे तरुण 25 वयोगटातील आहेत. विशेष म्हणजे यातील बरेच तरुण हे शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात आहेत. बीड शहरातील जाळपोळ प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांच्या हाती पाच अल्पवयीन तरुण सुद्धा लागलेत. हे पाच अल्पवयीन याच जमावामध्ये सहभागी झाले होते. 120 तरुणांमध्ये बहुतांश तरुण 25 ते 30 वयोगटातील आहेत.

आपल्यावर हल्ला करण्याचा उद्देश, प्रकाश सोळंखेंचा आरोप

माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांनी हल्लेखोरांची ओळख पटवली. यामध्ये इतर समाजाचे लोक देखील असल्याचं त्यांनी सांगितलं असून यामध्ये अवैध धंदे आणि राजकीय विरोधक कट रचून माझ्यावर हल्ला करण्यासाठी आला असल्याचं प्रकाश सोळंके यांनी आरोप केला. तर यामध्ये काही शिक्षक आणि ग्रामपंचायतचे सदस्य देखील असल्याचा दावा सोळंके यांनी केला आहे. काही हल्लेखोरांकडे धारदार शस्त्र देखील होती, त्यामुळे ते माझ्यावर हल्ला करण्याच्या उद्देशानेच आले असावे असे देखील सोळके म्हणाले होते.

जमावाचा उद्देश जीवाताला धोका पोहोचवण्याचा, जयदत्त क्षीरसागरांचा आरोप

बीडमध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या घरी देखील मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आली आणि यावर जयदत्त क्षीरसागर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अतिरेक्यांनाही लाजवणारा हा प्रकार असल्याचे सांगत ब्रिटिश आणि निजामाच्या काळात देखील अशा घटना घडल्या नाहीत. त्यामुळे या घटनेमध्ये मुख्य सूत्रधाराचा शोध पोलिसांनी लावावा. त्याचबरोबर जमावाचा उद्देश फक्त जाळपोळ करण्याचा होता की कोणाच्या जीविताला धोका पोहोचवण्याचा होता असा देखील प्रश्न जयदत्त क्षीरसागर यांनी उपस्थित केला. 

माजलगाव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके आणि बीड चे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर या दोन आमदाराच्या घरावर जाळपोळ केल्यानंतर आता यामागे राजकीय विरोधक असल्याचा गंभीर आरोप या नेत्यांनी केला आहे. पोलिसांनी या दोन्ही प्रकरणांमध्ये आतापर्यंत दीडशेपेक्षा जास्त जणांना ताब्यात घेतले असले तरी अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते अथवा नेते यात सहभागी असल्याचे पाहायला मिळत नाही. मग पोलीस या जाळपोळीच्या घटनांच्या मुळाशी कधी जाणार हाच खरा सवाल आहे.

ही बातमी वाचा: 

 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Bajrang Sonwane on Vilas Ghule Case: विलास घुले प्रकरणात मुलाचं नाव, बजरंग सोनवणेंचा विरोधकांना थेट इशारा, म्हणाले, 'ब्लॅकमेलिंग चालू आहे पण आता मी...'
विलास घुले प्रकरणात मुलाचं नाव, बजरंग सोनवणेंचा विरोधकांना थेट इशारा, म्हणाले, 'ब्लॅकमेलिंग चालू आहे पण आता मी...'
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Sandeep Kshirsagar: ‘सुनेत्राताईंनी पीएच्या मनावर कारभार करू नये’; निधी वाटपावरून संदीप क्षीरसागर संतापले, ध्वजारोहणाचे निमंत्रण न मिळाल्याने उघड नाराजी
'सुनेत्राताईंनी पीएच्या मनावर कारभार करू नये’; निधी वाटपावरून संदीप क्षीरसागर संतापले, ध्वजारोहणाचे निमंत्रण न मिळाल्याने उघड नाराजी

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
Embed widget