Beed News: गेवराई बस स्थानकात चालकाला जबर मारहाण, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
चालकाच्या सांगण्यावरून गेवराई पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या चौघा जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बीड: बसमधून प्रवास करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने सामान ठेवण्याच्या कारणावरून गेवराई आगारात (Beed News) एका बस चालकाला जबर मारहाण केली आहे.. बस चालकाला मारहाण करतानाचा व्हिडीओ आता समोर आला असून या मारहाणीत चालकाच्या तोंडाला जबर दुखापत झाल्याने चालकाच्या सांगण्यावरून गेवराई पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या चौघा जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
योगेश लव्हाळे असे मारहाण झालेल्या चालकाचे नाव असून बसमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याने चालकाच्या बाजूला समान ठेवल्याने दोघांमध्ये वाद झाला आणि यामध्ये पोलीस कर्मचारी आणि इतर तिघा जणांनी चालकाला बेदम मारहाण केली. या घटनेनंतर गेवराई आगारातील सर्व बस चालक कंडक्टर आणि कामगारांनी गेवराई पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यासाठी गर्दी केली होती तर जखमी झालेल्या चालकाला बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर स्थानकात मोठी खळबळ उडाली होती.
तरुणाला चिरडल्यानं संतप्त ग्रामस्थांनी बस फोडली, चालकाला बेदम मारहाण
राज्यात अनेक भागात एसटी महामंडळाचे वाहक आणि चालकावर हल्ले होत आहेत. काही दिवसापूर्वी भंडाऱ्यात ग्रामस्थांनी एसटीच्या चालकाला बेदम मारहाण केली होती. एसटी बसने रस्त्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या युवकाला चिरडल्याने संतप्त ग्रामस्थांनी एसटी बसची तोडफोड करत चालकाला बेदम मारहाण केली. राष्ट्रीय महामार्गावरील सर्विस रोडच्या बाजूला उभ्या असलेल्या तरुणाला भरधाव आलेल्या एसटी बसनं चिरडून अक्षरशः फरफटत नेलं. ही घटना भंडारा-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील फुलमोगरा या गावात घडली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत संताप व्यक्त करताना एसटी बसच्या चालकाला बेदम मारहाण केली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत संताप व्यक्त करताना एसटी बसच्या चालकाला बेदम मारहाण केली. सुशांत घरडे (वय 17) असं मृत तरुणाचे नावं आहे. अपघातग्रस्त बस (क्रमांक MH 40 Y 5142) ही नागपूरच्या घाटरोड डेपोची आहे. ही एसटी बस नागपूर इथून प्रवाशी घेऊन भंडारा इथं येतं होती. अपघातानंतर सुमारे अर्धा तास राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक थांबली होती. या घटनेमुळे फुलमोगरा गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं. जवाहरनगर पोलिस आणि दंगा नियंत्रण पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हे ही वाचा :