(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Beed News : आधी प्रयत्न केला अन् शेवटी त्याने आयुष्य संपवलंच, बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी तरुणाचं टोकाचं पाऊल
Beed News : मराठा आरक्षणाच्या मुद्दा सध्या चांगलाच पेटला आहे. त्यातच बीडमधील एका व्यक्तीने आरक्षणासाठी आपलं आयुष्य संपवलाने एकच खळबळ माजली.
बीड : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) बीडमधील (Beed) तरुणाने आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं असल्याची धक्कादायक बातमी सध्या समोर येत आहे. शुक्रवार (20 ऑक्टोबर) रोजी या तरुणाने झाडावर चढून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी देखील त्याने आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा तो प्रयत्न अयशस्वी ठरला. जगन्नाथ पांडुरंग काळकुटे असं या तरुणाचं नाव आहे. दरम्यान या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजल्याचं पाहायला मिळालं.
जगन्नाथ यांच्या जाण्याने त्याच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. दरम्यान मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्यांचं प्रमाण वाढत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे या मुद्द्यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
नेमकं काय घडलं?
शनिवार (21 ऑक्टोबर) रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 24 तासांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील झाडावर चढून एका आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सायंकाळी 7 वाजता अर्चना घरी आल्या असता जगन्नाथ काळकुटे यांनी घरात भगव्या गमजाने छताला गळफास लावून घेतला. तर याच तरुणाने दुसऱ्या दिवशी म्हणजे आज राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्य संपवलं. शनिवारी काळकुटे यांच्या पत्नी अर्चना या गावी शेती कामासाठी गेल्या होत्या. सध्या उत्तरीय तपासणीसाठी शिवाजीनगर पोलीसांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटूंबियांनी एकच आक्रोश केला.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग
जग्गनाथ पांडुरंग काळकुटे हे कुटुंबासह शेती करत होते. जग्गनाथ काळकुटे यांना निकिता ही अकरावीच्या वर्गात शिक्षण घेणारी मुलगी आणि इयत्ता सातवीच्या वर्गात शिक्षण घेणारा सार्थक हा मुलगा आहे. ह ते बीड शहरातील गोविंदनगर भागात गेल्या काही वर्षांपासून राहतात. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी होत असलेल्या आंदोलनात ते कायम सहभागी होत होते.
मराठा आरक्षणासाठी आत्महत्येचं सत्र?
काही दिवसांपूर्वी काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षण आंदोलनात सक्रीय असलेले सुनील कावळे यांनी मुंबईत आत्महत्या केली. सुनील कावळे यांनी 18 ऑक्टोबरच्या रात्री BKC येथील उड्डाणपुलावरील लोखंडी खांबला गळफास घेतला. त्यातच हिंगोलीच्या जिल्ह्यातील जिंतुर तालुक्यातील एका मराठा समाजाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली शैक्षणिक फी भरु न शकल्यामुळे या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. महाविद्यालयात शैक्षणिक शिक्षण घेत असताना घरची हालखीची परिस्थिती होती. त्यामुळे शैक्षणिक फीस भरु न शकल्यामुळे या विद्यार्थ्याने विष प्राशन करत स्वत:चं आयुष्य संपवलं. परमेश्वर चितरे असं या विद्यार्थ्याचं नाव होतं.
सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच पेटला असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी आंदोलनाची हाक दिलीये. त्यामुळे आता सरकार यावर कोणती कठोर पावलं उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.