Beed Jail War: जिरली काय रे तुझी आता...वाल्मिक कराडची तोंडावर इज्जत काढली, एका वाक्याने बीडच्या जेलमध्ये राडा
Beed Jail War: आता बीड कारगृहातील गिते आणि कराड गँगच्या हाणामारीबाबत नवीन माहिती समोर आली आहे.

Beed Jail War बीड: बीडच्या कारागृहात वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि बबन गिते गँगचा महादेव गिते (Mahadev Gite) एकमेकांना भिडल्याचे समोर आले. काल सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास गिते आणि कराड समर्थक यांच्यात जोरदार राडा झाला. मात्र नेमकी कुणी कुणाला मारलं याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे. कारण महादेव गितेनं वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला (Sudharshan Ghule) मारहाण केल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला. तर दुसरीकडे वाल्मिक कराडनेच मारहाण केल्याचा दावा महादेव गिते केला आहे. दरम्यान या मारहाणीच्या घटनेनंतर महादेव गितेसह चौघांना संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात हलवण्यात आलं आहे. याचदरम्यान आता बीड कारगृहातील हाणामारीबाबत नवीन माहिती समोर आली आहे.
बीडच्या जेलमध्ये काल सकाळी नाश्ताच्या वेळी बंदी उठवल्याने सर्व कैदी बाहेर मोकळे होते. महादेव गितेच्या समर्थकांकडून वाल्मिक कराडसह त्याच्या टोळीला बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरुन टोमणे मारण्यात आले. आता जिरली काय तुझी? की अजून जिरायची आहे, असे डायलॉग गिते गँगकडून सुरु होते. यानंतर गिते आणि कराड गँगमध्ये वाद झाला. त्यावेळी महादेव गिते आणि अक्षय आठवले हे दोघेजण वाल्मिक कराड याच्या अंगावर धावून गेले. तेव्हा बाजुलाच असणारा सुदर्शन घुले वाल्मिक कराडच्या मदतीसाठी धावून आल्याचं सांगण्यात येत आहे.
बीडमध्ये हालचालींना वेग, वाल्मिक कराडच्या तुरुंगातून आणखी 3 कैद्यांना हलवलं-
बीड जिल्हा कारागृहात मारहाणीच्या घटनेनंतर अक्षय आठवले मनीष शिरसागर व सवाई यांना नाशिकच्या कारागृहात हलवण्यात आले आहे. मारहाणीच्या घटनेनंतर महादेव गीते यासह इतर चौघांना संभाजीनगर येथील हरसुल कारागृहात हलवण्यात आले होते. आज अक्षय आठवले यांच्यासह इतर दोघांना नाशिक कारागृहात पाठवण्यात आले आहे.
वाल्मिक कराडला तीन-चार चापट्या मारल्या; अंजली दमानियांचा दावा
वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंच्या अतिशय जवळचा आहे. जावई असल्यासारखं त्याला सारखं प्रोटेक्ट करताना आपण एकदा नाही अनेकवेळा बघतोय. वाल्मिक कराडला व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट मिळतेय. त्याच्या छान सुखसोयी होतायेत आणि मला जी माहिती कारागृहातून मिळालीये आणि ती अगदी ऑथेंटिक आहे. वाल्मिक कराडला तीन चार चापट्या मारल्या होत्या. त्यांच्यात भांडणं टोकाची झाली. आरडाओरडा टोकाचा झाला होता. पण त्यांना फक्त माऱ्यामाऱ्या होतायेत तशी मारहाण नव्हती झाली. पण वाल्मिक कराडला तीन-चार चापट्या मारल्या होत्या, असं अंजली दमानिया यांनी सांगितले. वाल्मिक कराड त्यांच्या घरचा आहे. त्याच्या सुखसोयी ठेवून महादेव गितेची रवानगी आता दुसऱ्या ठिकाणी केली. त्यात काहीच नवल वाटत नाही, असं अंजली दमानिया म्हणाल्या.




















