भर रस्त्यावर पती-पत्नीची दे दणादण! पतीनं मुस्काटात मारताच पत्नीनं पायताणानं चोपलं, video व्हायरल
Beed:

Beed: गुन्हेगारी, गँगवॉर आणि मारामारीच्या घटनांमुळे सतत चर्चेत असलेल्या बीड शहरातून आणखी एक हाणामारी चर्चेचा विषय ठरलीय . मात्र यावेळी भांडण गुन्हेगारांमधील नव्हे, तर थेट पती-पत्नींमधील आहे. शहरातील जिल्हाधिकारी कचेरीसमोर भर रस्त्यावरच पती पत्नी भिडले , थेट हाणामारीवर उतरले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
गँगवॉर, शस्त्राच्या धाकानं केलेल्या मारहाणीच्या घटनांमध्ये आता बीड शहरात चर्चा रंगलीय पती पत्नीच्या हाणामारीची . भर रस्त्यावर चक्क पती आणि पत्नीच भिडले आहेत. बीड शहरातील जिल्हाधिकारी कचेरीसमोर दोघे पती पत्नी दुचाकीवरून घरी जात होते. यावेळी दोघात शाब्दिक चकमक उडाली... मग काय आधी पतीने मुस्कटात मारली त्यानंतर पत्नीने चक्क पायातील चप्पल काढून पतीला चांगलेच चोपले... हा सर्व प्रकार भर रस्त्यावर घडत असताना काही बहाद्दरांनी भांडणे सोडविण्यापेक्षा व्हिडिओ चित्रित करणेच पसंत केले. सध्या हा व्हिडिओ व्हायरल झाला असून पती पत्नीच्या मारहाणीची चर्चा शहरभरात रंगली आहे.
व्हिडीओ व्हायरल
या सर्व प्रकारात आजूबाजूच्या लोकांनी मोबाईल काढून संपूर्ण प्रकाराचे चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. परिणामी, पती-पत्नीतील या रस्त्यावरील हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, शहरभर या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे.
अमरावतीत भर रस्त्यात महिलेला तिघांकडून बेदम मारहाण
अमरावती जिल्ह्यातील विर्शी गावात एका महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करतानाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. वलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली आहे. शारदा बाभुळकर या महिलेवर तीन पुरुष आणि एका महिलेने मिळून बेदम हल्ला केल्याची माहिती समोर आली असून, संबंधितांचा मारहाण करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.























