अल्पवयीन मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या ठाकरे गटाच्या बीड जिल्हाप्रमुखाची अखेर 'हकालपट्टी'
Beed Crime News : अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी केज पोलिसात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अखेर शिंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
Beed Crime News : केज तालुक्यातील उमरी शिवारात कलाकेंद्राच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यातील आरोपी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदे (Ratnakar Shinde) यांना जिल्हा प्रमुख पदावरून तत्काळ पदमुक्त करण्यात आल्याचे प्रसिध्दी पत्रक शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी प्रसिद्धीस दिले आहे. काही दिवसांपूर्वी सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना मारहाण केल्याचा दावा करणारे अप्पासाहेब जाधव यांचा निलंबन झाल्यानंतर सुषमा अंधारे यांनीच रत्नाकर शिंदे यांची शिवसेना जिल्हाप्रमुख पदी निवड केली होती. मात्र अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी केज पोलिसात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अखेर शिंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
बीडच्या केज पोलिस ठाणे हद्दीत चालणाऱ्या एका कलाकेंद्रावर शुक्रवारी मध्यरात्री पोलिसांनी छापा मारला. यावेळी वेगवेगळ्या चार खोल्यांमध्ये काही अल्पवयीन मुली, महिला या पुरुषांसमोर नृत्य करताना पोलिसांना मिळून आल्या होत्या. तर यातील एका अल्पवयीन मुलीने तिला पैशाचे आमिष दाखवून नृत्य करण्यास लावत असल्याचे सांगितले. सोबतच या अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करून तिला वेश्याव्यवसाय करण्यासाठी देखील भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत 4 अल्पवयीन मुलींसह 28 महिलांची सुटका केली. तसेच 16 पुरुषांनाही ताब्यात घेतले. विशेष म्हणजे हा कलाकेंद्र ठाकरे गटाचा जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे चालवत होता. त्यामुळे शिंदेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुषमा अंधारेंच्या सांगण्यावरून शिंदेची नियुक्ती?
बीडमध्ये 20 मे रोजी शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा निघाली होती. दरम्यान याच महाप्रबोधन यात्रेच्या तयारीदरम्यान ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि ठाकरे गटाचे तत्कालीन जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांच्यात वाद झाला होता. तर आपण सुषमा अंधारे यांना मारहाण केल्याचा दावा जाधव यांनी केला होता. या सर्व घडामोडींनंतर जाधव यांची जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर अंधारे यांच्या समाजाचे असलेले आणि अंधारे यांच्या सांगण्यावरून रत्नाकर शिंदे यांना जिल्हाप्रमुख करण्यात आल्याची चर्चा होती. मात्र आता त्याच रत्नाकर शिंदेवर गंभीर गुन्हा दाखल झाल्याने अवघ्या दोन महिन्यात हकालपट्टी करण्यात आली आहे.
ठाकरे गटात नाराजी?
जाधव यांची हकालपट्टी केल्यावर सुषमा अंधारे यांचे समर्थक असलेल्या रत्नाकर शिंदेला जिल्हाप्रमुख करण्यात आले. परंतु ठाकरे गटातील अनेकांना ही नियुक्ती मान्य नव्हती. मात्र यावर उघडपणे कोणेही बोलयला तयार नव्हते. त्यामुळे अप्पासाहेब जाधव यांच्यासह अनेकांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करणे पसंद केले. तर काहींनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आपल्याला राहयचे असल्याने पक्ष बदलला नाही. पण त्यांची शिंदे बाबत नाराजी कायम होती.
इतर महत्वाच्या बातम्या:
ठाकरे गटाचा जिल्हाप्रमुख अल्पवयीन मुलींकडून करून घ्यायचा वेश्याव्यवसाय; बीड पोलिसांकडून कारवाई