Beed Crime : बीडसह मराठवाड्यात एवढे गावठी कट्टे कुठून येतात? त्याच्या तस्करीचा मार्ग कोणता?
Beed Crime News : मराठवाड्यात गावठी कट्टे विक्री करणारे एक रॅकेट आहे. खंडणी आपण आणि इतर गुन्ह्यासाठी धमकावण्यास या गावठी कट्ट्याचा वापर केला जातो.
बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्हा चर्चेत आला आहे. पण जेवढी चर्चा या बीड जिल्ह्याची आहे तेवढीच चर्चा या बीड जिल्ह्यातील पिस्तुल आणि गावठी कट्ट्यांची आहे. फक्त बीडच नव्हे तर मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही वर्षांत गावठी कट्ट्यांची विक्री वाढली आहे. पण मराठवाड्यात गावठी कट्टे नेमके येतात कुठून असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
पिस्तुलातून हवेत बार उडवणे हे मराठवाड्यात आता नेहमीचेच झालं आहे. परळीच्या निमित्ताने हा मुद्दा समोर आला. मराठवाड्यात किती गावठी कट्टे येतात आणि कुठल्या जिल्ह्यात किती वापरले जातात याची माहिती घेतली आणि पुढे आलं धक्कादायक वास्तव.
कोणत्या जिल्ह्यात किती जणांवर कारवाई?
- छत्रपती संभाजीनगर ग्रामीण : 07
- बीड : 26 गावठी कट्टे कारवाई
- धाराशिव : 13 गावठी कट्टे कारवाई
- जालना : 16 गावठी कट्टे कारवाई
- नांदेड : 44 गावठी कट्टे कारवाई
- लातूर : 8 गावठी कट्टे कारवाई
- हिंगोली : 11 गावठी कट्टे कारवाई
- परभणी : 06
मराठवाड्यात गावठी कट्टे विक्री करणारे एक रॅकेट आहे. खंडणी आपण आणि इतर गुन्ह्यासाठी धमकावण्यास या गावठी कट्ट्याचा वापर केला जातो.
बीडमध्ये हे कट्टे येतात तसे यावर एक नजर टाकूया
मराठवाड्यातील गावठी कट्टे बहुतेकदा अवैध मार्गाने बनवले जातात किंवा बाहेरील राज्यांमधून आणले जातात. या कट्ट्यांची निर्मिती आणि वितरण हे पूर्णपणे अनधिकृत व बेकायदेशीर असते.
कट्टे कसे तयार होतात आणि कुठून येतात?
उत्तर भारतातील राज्ये: उत्तर प्रदेश, बिहार, आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये अशा गावठी शस्त्रांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते. मराठवाड्यात या शस्त्रांची तस्करी करून आणली जाते.
स्थानिक निर्मिती: काही वेळा मराठवाड्यातील दुर्गम भागात, लहान गावांत किंवा जंगल परिसरातही कट्टे तयार होतात. यासाठी अर्धशिक्षित कारागीर किंवा लोहार त्याचा वापर करतात.
तस्करीचे मार्ग: हे शस्त्र स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांकडून रेल्वे, रस्ते वाहतूक किंवा खाजगी वाहने वापरून मराठवाड्यात पोहोचते.
गुन्हेगारी मागणी: राजकीय दबाव, स्थानिक वाद, किंवा इतर गुन्हेगारी कृत्यांमध्ये गावठी कट्ट्यांची मागणी वाढते, ज्यामुळे त्याचा प्रसार होतो.
बंदुकीचा परवाना काढण्यासाठी अनेक परवानग्या काढव्या लागतात. त्यामुळे शस्त्र परवाना काढणं हवं तेवढं सोपं नाही. पण गावठी कट्टा सहज मिळून जातो, तेही वीस ते पंचवीस हजार रुपयात. यासाठी ना कोणती एनओसी लागते ना, कोणत्या कार्यालयात खेट्या घालाव्या लागतात. त्यामुळे मराठवाड्यात गेल्या काही वर्षात गावठी कट्ट्यांचे प्रमाण वाढलं आहे. याच गावठी कट्ट्यांमुळे टोळक्यांचं प्रमाण वाढलं. बरं आता या टोळक्या एवढ्या मस्तावल्या आहे की, त्यांना वाटेल त्याचा ते जीव घेत आहेत.
ही बातमी वाचा: