मोठी बातमी! बीडमधील गर्भलिंग निदान करणाऱ्या सोनोग्राफी सेंटरवर धाड; गर्भपातासाठी लागणारे साहित्य जप्त
Beed Crime News : आरोग्य विभागाला माहिती मिळाल्यानंतर आरोग्य विभागाचे अधिकारी आणि पोलिसांनी छापा टाकत या महिलेला ताब्यात घेतले असून, तिचा साथीदार सतीश गवारे हा फरार झाला आहे.
Beed Crime News : बीडच्या (Beed) गेवराईमध्ये गर्भलिंग निदान (Pregnancy Diagnosis) करणाऱ्या सोनोग्राफी सेंटरवर (Sonography Center) धाड टाकून आरोग्य अधिकारी (Health Officer) आणि पोलिसांनी एका गर्भलिंग निदान करणाऱ्या महिलेला ताब्यात घेतले आहे. आरोपी महिलेकडून गर्भलिंग निदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि औषधे जप्त करण्यात आली आहेत. गेवराई शहरातील संजयनगर भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून ही महिला गर्भलिंग निदान चाचणी करत होती. याबाबत आरोग्य विभागाला माहिती मिळाल्यानंतर आरोग्य विभागाचे अधिकारी आणि पोलिसांनी छापा टाकत या महिलेला ताब्यात घेतले असून, तिचा साथीदार सतीश गवारे हा फरार झाला आहे. मनीषा सानप असे आरोपी महिलेचं नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील गेवराई शहरातील संजयनगर भागात मनीषा सानप नावाची एक महिला मागील काही दिवसांपासून अवैधरीत्या गर्भलिंग निदान केंद्र चालवत होती. याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली. त्यामुळे त्यांनी सुरवातीला खात्री केली असता याठिकाणी संबंधित महिला अवैधरीत्या गर्भलिंग निदान केंद्र चालवत असल्याचे स्फ्स्त झाले. त्यामुळे आरोग्य विभागाने याची माहिती पोलिसांना देऊन पोलिसांच्या मदतीने छापेमारी केली. यावेळी आरोपी महिलेकडे गर्भलिंग निदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि औषधे मिळून आले. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
'या' महिलेवर यापूर्वी देखील कारवाई...
विशेष म्हणजे यापूर्वी देखील गर्भलिंगनिदान चाचणी केल्याप्रकरणी या महिलेवर तात्कालीन जिल्हा शालेय चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांनी कारवाई केली होती. तसेच या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्यातून सुटल्यानंतर परत या महिलेने आपला गर्भलिंगनिदान चाचणीचा गोरख धंदा परत सुरू केला होता. याची माहिती मिळताच आरोग्य विभाग आणि पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन कारवाई केली आहे. तर, या महिलेवर गेवराईच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
शासनाच्या उपाययोजना कागदोपत्री...
बीड जिल्ह्यामध्ये मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी शासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना आणि जनजागृतीचे कार्यक्रम घेतले जात आहेत. यासाठी लाखो रुपये खर्च होत आहे. मात्र, कागदोपत्री जरी उपाययोजना केल्या जात असतील, पण प्रत्यक्षात राजरोजपणे असा गर्भलिंगनिदान चाचणीचा व्यवसाय सुरु असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या महिलेला कोणाचा अभाव होता असे देखील प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
धक्कादायक! बीड जिल्ह्यात मागील पाच वर्षात 4 हजार 714 महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या