Anjali Damania : अंजली दमानियांविरोधात वंजारी समाज आक्रमक, बीड पोलीस ठाण्यात ठिय्या
Anjali Damania, Beed : वंजारी समाज अंजली दमानिया यांच्याविरोधात आक्रमक झालाय.
Anjali Damania, Beed : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या विरोधात बीड मधील वंजारी समाज आक्रमक झाला आहे. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या प्रतिक्रियेत दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत दमानिया यांनी केलेल्या वक्तव्यानंतर वंजारी समाज आक्रमक झाला आहे.
"वंजारी समाजातील लोकांना पोलिसात भरती केले... शासनात भरती केले... मग हळूहळू त्यांना बीड कडे आणण्यात गेलं... हे लोक इतर समाजाच्या लोकांबरोबर काय न्याय करणार? इतर समाजाचे लोक या लोकांकडे गेल्यास त्यांना न्याय मिळणं शक्यच नाही.. त्यांना पैसे दिले जातात... असं विधान दमानिया यांनी केले होते", असं वक्तव्य दमानिया यांनी केलं होतं. या वक्तव्याने वंजारी समाज आक्रमक झाला असून दमानिया यांच्या विरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात ठिय्या मांडण्यात आला.. दमानिया यांच्या वादग्रस्त विधानांमुळे दोन समाजात वितुष्ट निर्माण होत असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी वंजारी समाज आग्रही आहे..
काल मी जे विधान केलं त्याबद्दल मोठ्या प्रमाणात जाणून बुजून वंजारी समाजात गैरसमज पसरवण्याचे काम हे धनंजय मुंडे व वाल्मिक कराड समर्थक करत आहेत.
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) January 3, 2025
वंजारी समाजातील लोकांबद्दल व त्यांच्या कर्तृत्वाबद्दल मी मुळीच बोलत नाही, तसे बोलण्याचे काहीच कारण नाही. मला पूर्ण कल्पना आहे की हा समाज…
अंजली दमानियांचे स्पष्टीकरण, काय काय म्हणाल्या?
अंजली दमानिया म्हणाल्या, काल मी जे विधान केलं त्याबद्दल मोठ्या प्रमाणात जाणून बुजून वंजारी समाजात गैरसमज पसरवण्याचे काम हे धनंजय मुंडे व वाल्मिक कराड समर्थक करत आहेत. वंजारी समाजातील लोकांबद्दल व त्यांच्या कर्तृत्वाबद्दल मी मुळीच बोलत नाही, तसे बोलण्याचे काहीच कारण नाही. मला पूर्ण कल्पना आहे की हा समाज अतिशय भोळा, कष्टाळू आणि मेहेनतू आहे. गोपीनाथ मुंडे यांनी या समजला मदतीचा हात दिला त्यात देखील काही चुकीचे नाही. चुकीचे आहे त्यांचा राजकीय वापर कारणे जे धनंजय आणि पंकजा मुंडे सरास करत आहेत. आपल्या मर्जीतील लोक परळी मधे ठेऊन ते समाजाच्या नावाखाली दुकान चालवत आहेत. माझा ह्याच गोष्टीवर अक्षेप आहे. युवापीढीला संत भगवान बाबांसारखं मार्गदर्शन करायचे सोडून, ही मंडळी दहशतीसाठी वापर करत आहे त्याचे वाईट वाटते. समंजस व बुद्धिमान वंजारी समाजाने हे समजून घ्यावे ही विनंती
इतर महत्त्वाच्या बातम्या