Mumbai Crime : साक्षीदार असलेल्या व्यापाऱ्याला गोळ्या झाडून संपवलं, मिरा रोडच्या शांती सेंटरमधील खळबळजनक घटना
Mumbai Crime : एका गुन्ह्यात साक्षीदार असलेल्या व्यापाऱ्याची गोळी झाडून हत्या करण्यात आलीये.
Mumbai Crime, मिरा रोड : मिरा रोडच्या (Mumbai Crime) शांती शॉपिंग सेंटरमध्ये आज रात्री 10 वाजता एका व्यापाऱ्याची गोळी झाडून निर्घृण हत्या (Mumbai Crime)करण्यात आली. मृत व्यक्तीचे नाव शम्स तमरेज अन्सारी उर्फ सोनू (३५) असे असून, त्याचे चष्मा विक्रीचे दुकान या शॉपिंग सेंटरमध्ये होते. दरम्यान, रात्रीच्या वेळी हत्या झाल्यानंतर संपूर्ण मीरा रोड परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस घटनास्थळी (Mumbai Crime)दाखल झाले असून पुढील तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.
अधिकची माहिती अशी की, मोहम्मद अन्सारी एका गंभीर गुन्ह्यात साक्षीदार होता, यामुळे त्याला काही दिवसांपासून धमक्या मिळत होत्या. या धमक्यांबाबत अन्सारीने पोलीस ठाण्यात तक्रार देखील केली होती. मात्र,आज रात्री अज्ञात हल्लेखोराने शॉपिंग सेंटरमध्ये अन्सारीच्या डोक्यात गोळी झाडली. हत्या घडल्यानंतर नयानगर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळाची तपासणी करण्यात येत असून, हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे गोळा केले जात आहेत. घटनेमुळे शांती शॉपिंग सेंटर आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मोहम्मद अन्सारीचा हल्लेखोराशी पूर्वीचा वाद होता का, तसेच त्याच्या हत्येचा संबंध त्याला मिळालेल्या धमक्यांशी आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
माजी सरपंचावर अज्ञात हल्लेखोरांकडून प्राणघातक हल्ला, दोन्ही पाय तोडले
बीड जिह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्येचे प्रकरण राज्यभर गाजत असतानाच, ठाणे जिल्ह्यातही अजनुप ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचावर भर रस्त्यात कार अडवून त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांकडून प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या धक्कादायक बाब म्हणजे या हल्यात माजी सरपंचाचे दोन्ही पाय तोडल्याने त्यांच्यावर कल्याण मधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लखोरांवर गुन्हा दखल करून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. कदम उघडे असे हल्ल्यात गंभीर झालेल्या माजी सरपंचाचे नाव असून त्यांच्या कारची देखील तोडफोड करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ठाणे जिल्हातील शहापूर तालुक्यातील कसारा भागात अजनुप ग्रामपंचायत असून या अजनुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कदम उघडा हे आपल्या कामानिमित्ताने घरून कार ने एकटेच आज ( 2 जानेवारी रोजी) सकाळी 10 वाजता निघाले होते. मात्र त्याच सुमारास अजनुप ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या गायधरा गावाच्या माळ रानात ते कार जात असतानाच काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची कार अडवली व कारवर दगडांचा मारा केला. त्यानंतर कारच्या आतमध्ये असलेले माजी सरपंच कदम उघडे यांना हल्लेखोरांनी कार बाहेर काढत बेदम मारहाण केली. या मारहाणीत माजी सरपंचाचे दोन पाय जब्बर मार लागल्याने त्यांना शहापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी दोन पाय तुटल्याचे सांगितले यामुळे पुढील उपचारासाठी कल्याण येथे पाठवण्यात आले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या