Anjali Damania: अंजली दमानियांना मिळालं गोपनीय पत्र, वाल्मिक कराडबाबत नवा दावा, कागदपत्रांसह केला मोठा गौप्यस्फोट
Anjali Damania on walmik Karad: अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी सोशल मिडिया पोस्ट करून त्यामध्ये त्यांनी माहिती आणि काही कागदपत्रे देखील शेअर केली आहेत.
बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या अपहरण आणि हत्येचा ठपका असलेला वाल्मिक कराड (Walmik Karad) याचे अनेक कारनामे समोर येत आहे. त्याच्या बाबतीतील माहिती देखील समोर येत आहे. बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी, नागरिकांमध्ये असलेली दहशत आणि प्रशासकीय यंत्रणेवरील त्याचा दबाव यानिमित्ताने समोर येत आहे. त्याचे अनेक घोटाळे, गुन्हे याबाबत आता चर्चा होताना दिसत आहे. अशातच सामजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी पुन्हा एकदा वाल्मिक कराडच्या (Walmik Karad) वाइन दुकानाचा काळाबाजार बाहेर काढला आहे. अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी सोशल मिडिया पोस्ट करून त्यामध्ये त्यांनी माहिती आणि काही कागदपत्रे देखील शेअर केली आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण?
अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी सोशल मिडियावरती कागदपत्र शेअर केली असून बीडमधील वाईनच्या दुकानांसंदर्भात त्यांनी आरोप केले आहेत. यासाठी त्यांना मिळालेल्या एका पत्राचा उल्लेख अंजली दमानिया यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे.
अंजली दमानिया यांनी काय म्हटलंय पोस्टमध्ये?
अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी आज (मंगळवारी) सकाळी केलेल्या या पोस्टमध्ये त्यांना एक गोपनीय पत्र मिळाल्याचं म्हटलं आहे. 'एक गोपनीय पत्र काल संध्याकाळी आलं. या पत्राची माहिती मी मुख्यमंत्र्यांना दिली आहे. या पत्रात लिहिलं आहे की, समाजसुधारक वाल्मिक कराड (Walmik Karad) यांची केज, वडवनी, बीड आणि परळी इथे चार ते पाच वाईनची दुकानं आहेत. या प्रत्येक वाईन दुकानाचा बाजारभाव पाच कोटी इतका आहे. ही जमीन केज येथे 1 कोटी 69 लाखांना 29 नोव्हेंबर 2024 रोजी घेतली. तीन दिवसांत याला परवानगी दिली गेली. वास्तविक जमिनीचा सातबारा 15 दिवसांनंतर होतो. पण सगळे कायदे कसे धाब्यावर बसवण्यात येतात याचं हे उदाहरण आहे', असं अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
एक गोपनीय पत्र काल संध्याकाळी आले ज्याची माहिती मी मुख्यमंत्र्यांना दिली.
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) January 7, 2025
पत्रात लिहिले आहे की समाजसुधारक वाल्मिक कराड यांची केज, वडवनी, बीड आणि परळी येथे चार ते पाच वाइन ची दुकाने आहेत. प्रत्येक वाइन दुकानाचा बाजार भाव ५ कोटी इतका आहे.
ही जमीन केज येथे १,६९,००,००० २९/११/२४… pic.twitter.com/kZqVoS1BTe
अंजली दमानियांच्या मुख्यमंत्र्यांकडे 10 मागण्या
काल मुख्यमंत्र्यांना दिलेले पत्र व प्रमुख मागण्या
१. संतोष देशुखांच्या हत्येच्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे
२. धनंजय मुंडे हे वाल्मिक कराड यांच्या अतिशय जवळचे आहेत म्हणून त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे
३. SIT बरखास्त करुन बीड जिल्ह्या बाहेरचे चांगले ऑफिसर च्या ऑफिसर्स नी तपास करावा .
४. तपास on camera झाला पाहिजे.
५. बीड मधे एक hotline नंबर सुरू करण्यात यावा. तक्रार देणाऱ्यांची गुप्तता
बाळगण्यात यावी.
६. बिंदुनामावली बीड मधे पळाली जात नाही. त्याची सत्यता बघण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात यावे.
७. सगळे सत्र परवान्यांची चौकशी करण्यात यावी
८. परळी Thermal project येथे एक स्पेशल फ़ोर्स लावण्यात यावा व हा परिसर सीसीआयटी ने कवर करण्यात यावा. राख माफिया बंद करण्यासरही हे करण्यात यावे
९. ज्या वाहनांना वर नंबर प्लेट्स नाही अशी सगळी वाहने जप्त करण्यात यावी
१०. पवन चक्कीची जबाबदारी ही जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात यावी व यातून येणारे भाडे हे शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात यावे
काल मुख्यमंत्र्यांना दिलेले पत्र व प्रमुख मागण्या
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) January 7, 2025
१. संतोष देशुखांच्या हत्येच्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे
२. धनंजय मुंडे हे वाल्मिक कराड यांच्या अतिशय जवळचे आहेत म्हणून त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे
३. SIT बरखास्त करुन बीड जिल्ह्या बाहेरचे चांगले ऑफिसर च्या ऑफिसर्स… pic.twitter.com/fwU3jjhske