एक्स्प्लोर

VIDEO Suresh Dhas : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सुरेश धसांची गौप्यस्फोटाची मालिका, आता पंकजा मुंडेंचेही नाव घेतलं, म्हणाले...

Santosh Deshmukh Murder Case : वाल्मिक कराडने ज्या महिला अधिकाऱ्याला फोन करून एका गुन्हेगाराची सुटका करण्यास सांगितले त्या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे. 

मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एकीकडे वाल्मिक कराडचा पाय खोलात जात असतानाच दुसरीकडे धनंजय मुंडे यांचीही अडचण वाढताना दिसत आहे. भाजपचे आमदार सुरेश धसांनी हे प्रकरण पहिल्या दिवसांपासून लावून धरलं आहे. अशातच सुरेश धसांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि त्यानंतर अनेक गौप्यस्फोट केले. यावेळी त्यांनी भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांचेही नाव घेतलं. 

बीडमध्ये एका प्रकरणात आरोपीला सोडून देण्यासाठी वाल्मिक कराडने एका महिला पोलिस अधिकाऱ्याला फोन केला होता. त्याची ऑडिओ क्लिप आता व्हायरल होत आहे. वाल्मिक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपचा तपास करावा, फोनवरुन बोलणाऱ्या महिला अधिकारी कोण याचा शोध घ्यावा अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली.

पंकजा मुंडेंवर काय म्हणाले? 

मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आल्यानंतर माध्यमांशी बोलताना सुरेश धस म्हणाले की, "परळीमधील भगवान गडावर झालेल्या दसरा मेळाव्यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचे पान हालत नाही असे वाल्मिक कराड.  आता वाल्मिक कराड आणि महिला अधिकाऱ्यामध्ये जो फोन झाला ते प्रकरण अतिशय गंभीर आहे. आता ते पानसुद्धा धनंजय मुंडेंशिवाय हाललंय की नाही ते मला बघायचं आहे."

एकाच रस्त्यावर पाच पाच वेळा पैसे उचलले

परळी नगरपालिकेच्या कामाचं ऑडिट करावं अशी मागणी सुरेश धस यांनी केली. ते म्हणाले की, परळीतील एकाच रस्त्यावर पाच पाच वेळा पैसे उचलण्यात आले. एकेका व्यक्तीच्या नावावर 46 लाखांची बिलं निघाली. या सर्व प्रकरणांची चौकशी करण्यात यावी. 

करुणा मुंडेंच्या कारमध्ये पिस्तुल ठेवणारा पोलिस अद्याप सेवेत

करुणा मुंडे यांच्या कारमध्ये पिस्तुल ठेवणारा साडीतील पोलिस अधिकारी कोण होता याचा शोध घ्यावा. तो पोलिस आजही बीड पोलिस दलात कार्यरत आहे असा आरोप सुरेश धसांनी केला. 

बीडमध्ये एकाच ठिकाणी पोलिस 15-20 वर्षे कार्यरत

बी़डमध्ये एक पोलिस अधिकारी हा 15 वर्षांपासून कार्यरत आहे. त्याचे राखेचे 100 टिप्पर आहेत, 15 जेसीबी आहेत आणि त्याची जिल्ह्यातील मटक्यामध्ये भागिदारी आहे. त्याची चौकशी करण्यात यावी.  तसेच अनेक पोलिस हे गेल्या 20 वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांची जिल्ह्याच्या बाहेर बदली करावी. बीडमध्ये बिंदू नामावलीमध्ये घोळ झाला याची माहिती घ्यावी अशी मागणी सुरेश धसांनी केली. 

बीडमधील पोलिस दलाची नियुक्ती हीच आकाने केली आहे. त्यामुळे गडचिरोलीचे पालकमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांनी ते सर्व पोलिस दल उचलावं आणि गडचिरोलीला न्यावं अशी मागणी सुरेश धसांनी केली आहे. 

राखेचे अवैध साठे जप्त करावेत

महानिर्मिती कंपनी जरी प्रायव्हेट असली तरी त्याचे खासगीकरण शासनाने केले आहे.  त्या राखेची किंमत कोट्यवधींची आहे. परळी थर्मलमधील राखेचे अवैध साठे जप्त करण्यात यावेत. ती यादी मी पोलिस अधिकाऱ्यांकडे देणार असून त्यांनी त्यावर कारवाई करावी अशी मागणी सुरेश धसांनी केली. 

त्या ऑडिओ क्लिपमधील महिला अधिकारी कोण? 

एका गुन्ह्यातील आरोपीला सोडण्यासाठी वाल्मिक कराडने महिला पोलिस अधिकाऱ्याला फोन केला होता. ती महिला अधिकारी कोण आहे याची चौकशी व्हावी. त्या महिला अधिकाऱ्याने स्पीकर ऑन कसा केला, काय चर्चा झाली याची माहिती घ्यावी. तसेच ते प्रकरण गंभीर असून नेमकं काय आहे याचा तपास मीडियाने करावा अशी मागणी सुरेश धसांनी केली. 

दोन वर्षांपूर्वी बीडमधील व्यापारी भगिरथ बियानी यांनी आत्महत्या केली होती. त्या प्रकरणाचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुरेश धसांनी केली आहे.

सौरभ भोंडवे केसमध्ये सुरुवातीला वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल करुन घेण्यात आला नव्हता. सौरभ भोंडवेचे वडील आपल्याकडे आले होते. आकाच्या माणसाने त्याची केस दाखल करून घेतली नव्हती. आता मात्र पोलिसांना सांगितल्यानंतर केस दाखल करून घेतली आहे अशी माहिती सुरेश धसांनी दिली. 

आका हे बीडचे सुपर पालकमंत्री

सुरेश धस म्हणाले की, "2019 ते 2024 या कालावधीत धनंजंय मुंडे हेच पालकमंत्री होते. तर आका हे सुपर पालकमंत्री होते. ते जिल्ह्याचे बाप समजतात. त्यांनी 11 तालुक्यांना 100 कोटी द्यायचे आणि एकाच तालुक्याला 300 कोटी द्यायचे असं सुरू होतं. आता त्यामध्ये किती पैसे खाल्ले आहेत याची चौकशी करावी. परळी नगरपालिकेचे ऑडिट करण्याची मागणी केली आहे."

पाच हजार कोटींचा पीक विमा भ्रष्टाचार

राज्यात 5000 कोटींचा पीक विमा घोटाळा झाला असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

 

ही बातमी वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Sandeep Kshirsagar: ‘सुनेत्राताईंनी पीएच्या मनावर कारभार करू नये’; निधी वाटपावरून संदीप क्षीरसागर संतापले, ध्वजारोहणाचे निमंत्रण न मिळाल्याने उघड नाराजी
'सुनेत्राताईंनी पीएच्या मनावर कारभार करू नये’; निधी वाटपावरून संदीप क्षीरसागर संतापले, ध्वजारोहणाचे निमंत्रण न मिळाल्याने उघड नाराजी
Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
Manoj Jarange Patil and Chandrashekhar Bawankule: मनोज जरांगेंचे आरोप तथ्यहीन, बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या सूचना दिल्याच नाहीत; बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
मनोज जरांगेंचे आरोप तथ्यहीन, बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या सूचना दिल्याच नाहीत; बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
Embed widget