एक्स्प्लोर

Bajrang Sonwane: 'मी प्रेस घेतल्यास खासदाराची...'; सहाय्यक पोलीस निरीक्षकाची बजरंग सोनवणे यांच्याविरोधात वादग्रस्त पोस्ट

Bajrang Sonwane: सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे हे नेहमीच वादग्रस्त ठरलेले आहेत.

Bajrang Sonwane बीड: बीडच्या जिल्हा पोलीस प्रेस व्हॉट्सअॅप ग्रुपवर एका सहाय्यक पोलीस निरीक्षकानेच खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांच्या बाबत वादग्रस्त पोस्ट केली. या पोस्टनंतर काही वेळातच वरिष्ठांकडून त्यांना रिमुव्ह करण्यात आलं. मात्र पोलिसांनीच खासदारांविरोधात केलेल्या पोस्टने चर्चेचा विषय बनला आहे. 

सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे हे नेहमीच वादग्रस्त ठरलेले आहेत. बीड पोलीस प्रेस ग्रुपवर त्यांनी शनिवारी एक पोस्ट केली. ज्यात खासदार बजरंग सोनवणे यांच्या विरोधात वादग्रस्त लिखाण होते. बजरंग सोनवणे यांनी शुक्रवारी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करत गणेश मुंडे आणि दहिफळे या दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी केली आणि आज गणेश मुंडे यांनी एसपींच्या अधिपत्याखाली सुरू असलेल्या या ग्रुपवर ही पोस्ट केली. 

गणेश मुंडे यांनी पोस्टमध्ये काय म्हटलंय?

गणेश मुंडे यांनी एसपींच्या अधिपत्याखाली सुरु केलेल्या बीड पोलीस प्रेस या व्हॉट्सअॅप ग्रुपवर शनिवारी (4 जानेवारी) रोजी सायंकाळी एक पोस्ट केली. यामध्ये ''या खासदाराची चड्डीसुद्धा जागेवर राहणार नाही, मी प्रेस घेतली तर..., असं म्हटलं. या पोस्टनंतर खासदार कोण?, अशी विचारणा देखील काही पत्रकारांनी ग्रुपवर केली. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी गणेश मुंडे यांना सदर ग्रुपमधून काढून टाकले.

गणेश मुंडे आणि दहिफळे या दोन सहाय्यक पोलीस निरिक्षकांचे कॉल रेकॉर्ड तपासा; बजरंग सोनावणेंची मागणी

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या करण्यात आली. या प्रकरणातील सहा आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली असून एक आरोपी अजूनही फरार आहे. दरम्यान याप्रकरणातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी बजरंग सोनावणे यांनी केली आहे. तसेच बजरंग सोनावणे यांनी गणेश मुंडे आणि दहिफळे या दोन सहाय्यक पोलीस निरिक्षकांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी केली आहे. 

तीनही आरोपींना 14 दिवसांची सीआयडी कोठडी-

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे या तीनही आरोपींना 14 दिवसांची सीआयडी कोठडी देण्यात आली आहे. केज न्यायालयाचे प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एस व्ही पावसकर यांनी ही शिक्षा सुनावली आहे.  या तीनही आरोपींना 25 दिवसांनंतर अटक करण्यात आली आहे. फरार असलेला मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेच्या मुसक्या एसआयटीच्या पथकाने बालेवाडीत आवळल्या. अद्याप या प्रकरणातील आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे मात्र फरार आहे. 

संबंधित बातमी:

Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट, सुदर्शन घुलेसह तिन्ही आरोपींना 14 दिवसांची CID कोठडी

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
High Court Exam Issue : उच्च न्यायालयाच्या लिपिक टंकलेखन कौशल्य ऑनलाइन परीक्षेत गोंधळ, अभिजीत दिपकेंचा आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा, म्हणाले...
उच्च न्यायालयाच्या लिपिक टंकलेखन कौशल्य परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु, अभिजीत दिपकेंचा पाठिंबा, फेरपरीक्षेची मागणी
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Embed widget