दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत भारत बांगलादेशच्या जवळ, IMF च्या आकडेवारीवरुन राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या आकडेवारीवरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत आता बांगलादेशही भारताला मागे टाकण्याच्या मार्गावर आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय नाणे निधी अर्थात IMF च्या एका नव्या आकडेवारीवरुन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी त्यांच्या एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "भाजपची गेल्या सहा वर्षाची कामगिरी आणि 'तिरस्काराने भरलेल्या सांस्कृतिक राष्ट्रवादा'मुळे दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत बांगलादेशही आता भारताच्या मागे टाकण्याच्या वाटेवर आहे.
राहुल गांधींनी त्यांच्या ट्वीटमध्ये आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या आकडेवारीचा दाखला दिला आहे. आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउट लूकच्या या ताज्या अहवालानुसार दरडोई उत्पन्ना संदर्भात बांगलादेशही आता भारताच्या अत्यंत जवळ येऊन पोहोचला आहे.
राहुल गांधीनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "भाजपच्या गेल्या सहा वर्षाच्या तिरस्काराने भारलेल्या सांस्कृतिक राष्ट्रवादामुळे अर्थव्यवस्थेने जबरदस्त कामगिरी संपादन केली आहे. आता बांगलादेशही भारताला दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत मागे टाकण्याच्या वाटेवर आहे."
Solid achievement of 6 years of BJP’s hate-filled cultural nationalism:
Bangladesh set to overtake India. ???????????? pic.twitter.com/waOdsLNUVg — Rahul Gandhi (@RahulGandhi) October 14, 2020
काय आहे IMF चा अनुमान? IMF च्या अनुमानानुसार 2020 सालासाठी बांगलादेशचं दरडोई उत्पन्न हे चार टक्क्यांनी वाढून तो 1877 डॉलर इतकं झालं आहे. तर भारताचं दरडोई उत्पन्न हा 1,888 डॉलर इतकं आहे. भारताचा आणखी एक शेजारी नेपाळचं दरडोई उत्पन्न 1116 डॉलर इतकं आहे.
कोरोनाच्या संकटामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. जगात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था अशी ख्याती असणारी भारतीय अर्थव्यवस्था आता मंदावली आहे. मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या ताज्या आकडेवारीनुसार या वर्षी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये 10.3 टक्क्यांनी घसरण होण्याची शक्यता आहे.
India's economy projected to decline by 10.3% this year: International Monetary Fund (IMF)
(Data source: International Monetary Fund) pic.twitter.com/rnbgiEKqfr — ANI (@ANI) October 13, 2020
असे असले तरी 2021 साली भारताच्या अर्थव्यवस्थेत 8.8 टक्के विकासाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा अंदाज चीनच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या अपेक्षित अंदाजापेक्षा ( 8.2 टक्के ) जास्त आहे. असे झाल्यास भारतीय अर्थव्यवस्था ही पुन्हा एकदा जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरेल.
आंतरराष्ट्रीय नाणे निधी अर्थात IMF आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीआधी World Economic Outlook हा अहवाल प्रकाशित केला जातो. त्यात देशोदेशींच्या अर्थव्यवस्थांबद्दल अंदाज लावले जातात.
जीडीपी खड्ड्यात, विकासदर झोपला, कर्जाचा हिमालय, कर्ज घेतलं नसतानाही तुमच्यावर 78 लाखांचं कर्ज कसं?



















