न्याय अन् हक्क मिळवण्यासाठी आंदोलन करावं लागतंय, उज्ज्वल निकमांच्या नियुक्ती पंधरा दिवसा अगोदर का काढली नाही?: बजरंग सोनावणे
बीड प्रकरणातील आरोपींना जेलमध्ये, पोलिसांकडे VVIP ट्रीटमेंट मिळत आहेत. सहा तारखेला घटना घडली त्यावेळी आरोपींना मदत करणारे जे लोक आहेत त्यांना सुद्धा सहआरोपी करा अशी मागणी बजरंग सोनावणे यांनी केलीय.

बीड : उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांची नियुक्ती केली त्याबद्दल सरकारचे अभिनंदन. मात्र ही घटना का आणि कशी घडली याचा तपास पोलिसांनी करावा. दरम्यान, खंडणी प्रकरणात 28 मेला रमेश घुले याची खंडणी प्रकरणात चौकशी का केली नाही? तसेच वाशीचे पोलीस निरीक्षक यांच्या हद्दीतून आरोपी पळून गेले. त्यासंदर्भात त्यांची ही चौकशी झाली पाहिजे. 9 तारखेला घडलेल्या प्रकरावरून पोलिसांच्या भूमिकेवर संशय येतोय. किंबहुना आरोपींना मदत करणाऱ्यांना नोटीस देऊन सोडणार आहात का? त्यांना सहआरोपी का करत नाहीत? असा संतप्त सवाल करत बीडचे खासदार बजरंग सोनावणे (Bajrang Sonwane) यांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर भाष्य केलं आहे.
उज्वल निकम यांची ऑर्डर पंधरा दिवस अगोदर कां काढली नाही?
आरोपींना जेलमध्ये आणि पोलिसांकडे ही व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत आहेत. सहा तारखेला घटना घडली त्यावेळी आरोपींना मदत करणारे जे लोक आहेत त्यांना सुद्धा सहआरोपी करा. आमच्या लोकांवर वॉच ठेवण्यासाठी येथे कोणी माणूस ठेवला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाईंड पकडला पाहिजे. मस्साजोगचे गावकरी आणि देशमुख कुटुंबाच म्हणणं काय हे देखील पोलीस अधीक्षक यांनी मागितले आहे ते आम्ही मुद्देसुद देणार आहोत. मात्र आज काढलेली उज्वल निकम यांची ऑर्डर पंधरा दिवस अगोदर कां काढली नाही? असा सवाल ही खासदार बजरंग सोनावणे (Bajrang Sonwane) यांनी विचारला आहे.
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अखेर सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर अॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भातील माहिती राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याप्रकरणी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी मस्साजोगचे ग्रामस्थ आणि आमदार सुरेश धस यांनी केली होती. अखेर मुख्यमंत्र्यांनी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. या प्रकरणावर बोलताना खासदार बजरंग सोनावणे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
न्याय आणि हक्क मिळवण्यासाठी ही आंदोलन करावे लागतंय, हे दुर्दैवी- बजरंग सोनावणे
एसआयटी आणि सीआयडी यासंदर्भात समोर येऊन माहिती का देत नाही. मुख्यमंत्री महोदयांनी अन्नत्याग आंदोलन करण्याच्या अगोदर न्याय द्यायला पाहिजे होता. न्याय मिळवण्यासाठी आणि हक्क मिळवण्यासाठीही आंदोलन करावे लागतंय. हीच बाब स्वतःवर आल्यावर काय होईल याचा विचार करून मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यायला पाहिजे होता. असेही खासदार बजरंग सोनावणे म्हणाले.
























