Milk in monsoon : पावसाळ्यात दूध पिणे आरोग्यासाठी हानिकारक; 'हा' आजार होण्याची शक्यता
Milk in monsoon : दूध प्यायल्याने पोटाचा त्रास, अॅसिडिटी आणि पोट खराब होऊ शकते.
Milk in monsoon : पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत आणि पावसाळ्यात दूध न पिण्याचा सल्ला अनेकदा घरातील सदस्य आपल्याला देतात. हे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. पण, ते असं का म्हणतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? खरंतर पावसाळ्यात दूध प्यायल्याने पोट खराब होऊ शकते. एवढेच नाही तर ते तुमची संपूर्ण पचनसंस्था बिघडू शकते. दुधामुळे अन्न विषबाधा देखील होऊ शकते. दूध प्यायल्याने पोटाचा त्रास, अॅसिडिटी आणि पोट खराब होऊ शकते. या ऋतूत दूध प्यायल्याने शरीराला अनेक प्रकारे नुकसान होऊ शकते.
पावसाळ्यात दूध पिणे योग्य आहे का?
आयुर्वेदानुसार पावसाळ्यात दूध पिऊ नये कारण त्यामुळे शरीराला अनेक प्रकारे नुकसान होते. पाऊस हा एकमेव असा ऋतू आहे ज्यामध्ये कीटकांचा प्रजनन हंगाम असतो. अशा स्थितीत गाई-म्हशींच्या चार्यात विषारी किडे येऊ शकतात. ते खाल्ल्याने प्राण्याला संसर्ग होऊ शकतो. त्यानंतर दूध प्यायल्याने तुम्हाला फूड पॉयझनिंगची बाधा देखील होऊ शकते.
पोट बिघडण्याची समस्या उद्भवते
पावसाळ्यात दूध प्यायल्याने पचनाच्या समस्या होऊ शकतात. खरंतर, या ऋतूत दूध प्यायल्याने पाचक एंझाइम खराब होतात. एवढेच नाही तर, यामुळे शरीरात अनेक प्रकारच्या रिअॅक्शन्सही होऊ शकतात. कोणताही पदार्थ खाल्ल्यास ती पचायला वेळ लागतो, त्यामुळे चयापचय मंद होतो.
पावसाळ्यात 'अशा' प्रकारे दूध प्या
पावसाळ्यात जनावरांना आजार होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत दूध पिणे तुमच्या शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे अशा हवामानात दूध पिणे टाळावे. जर तुम्हाला दूध प्यायची सवय असेल तर दूध व्यवस्थित गरम करून त्यात चिमूटभर हळद टाका. हे दूध तुमच्या शरीरासाठी चांगलं असेल. मात्र, याचाही अतिरेक करू नका.
अशा प्रकारे पावसाळ्यात फक्त दूधच नाही तर पालेभाज्या, आंबा, कलिंगड, टरबूज ही फळ आणि भाज्यादेखील न खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून अनेकदा दिला जातो. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. अन्यथा, तुम्हाला आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :