Yamaha YZF-R15S V3 Black Edition : Yamaha ची YZF- R15S version 3.0 आता ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध; दमदार फिचर्सची पर्वणी
Yamaha YZF-R15S V3 Black Edition : लोकांची आवड लक्षात घेत कंपनीनं YZF R15 S V3 मॅट ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये लॉन्च करत ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित केलं आहे. या बाईकची किंमत 160,900 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) ठेवण्यात आली आहे.
Yamaha YZF-R15S V3 Black Edition : यामाहा मोटर इंडियानं आपल्या R15 सीरिजमधील प्रसिद्ध बाईक YZF R15 S V3 (YZF- R15 SV) ची नवी आकर्षक मॅट ब्लॅक कलरमध्ये लॉन्च केली आहे. देशातील स्पोर्ट्स बाईक शौकीनांसाठी नव्या ढंगात YZF-R15S V3 सादर करण्यात येणार आहे. कंपनीने द कॉल ऑफ द ब्लू कॅम्पेनअंतर्गत सादर केलेल्या या नव्या YZF R15 S (YZF R15 S) वर्जन 3.0 बाईकमध्ये युनिबॉडी सीटचं फिचर देण्यात आलं आहे. मॅट ब्लॅक कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये ही बाईक एक सुपर मॉडेल स्पोर्ट्स बाईक आलिशान आणि आकर्षक लूक देते.
फिचर्स आणि लूक
नवीन Yamaha YZF- R15 S वर्जन 3.0 च्या मॅट ब्लॅक एडिशनमध्ये लिक्विड कूल 4 स्ट्रोक SOHC 4 वॉल्व्ह फ्यूएल इंजेक्टेड 155 cc इंजिनसह व्हेरिएबल वॉल्व्ह ऍक्च्युएशन (VVA) आणि असिस्ट अँड स्लिपर क्लच सिस्टमसारख्या आधुनिक फिचर्ससह लॉन्च करण्यात आली आहे. ही बाईक बनवताना कंपनीनं लूक आणि फिचर्सच्या बाबतीत कोणतीही कसर सोडलेली नाही. यासह, कंपनीनं असेही संकेत दिले आहेत की, ते लवकरच इलेक्ट्रिक टू व्हीलर सेगमेंटमध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर देखील लॉन्च करू शकतात.
काय असेल किंमत?
यामाहानं YZF- R15 SV3 बाईकला गेल्या वर्षी रेसिंग ब्लू कलरमध्ये सादर केलं होतं. तेव्हापासून या स्पोर्ट्स बाईकची क्रेझ ग्राहकांमध्ये निर्माण झाली होती. ग्राहकांकडून आलेल्या प्रतिक्रियांमधून ही बाईक ब्लॅक कलरमध्ये यावी अशी मागणी केल्याचं समोर आलं होतं. ग्राहकांची हीच आवड लक्षात घेत कंपनीनं ही बाईक मॅट ब्लॅक कलरमध्ये लॉन्च केली. या बाईकची किंमत 160900 रूपये निश्चत करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :