Suzuki Katana 2022: सुझुकीने लॉन्च केली नवीन स्पोर्ट्स बाईक, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Suzuki Katana 2022: Suzuki Motorcycle India ने सोमवारी देशात आपली नवीन 2022 Katana (2022 Katana) स्पोर्ट्स बाईक लॉन्च केली आहे.
Suzuki Katana 2022: Suzuki Motorcycle India ने सोमवारी देशात आपली नवीन 2022 Katana (2022 Katana) स्पोर्ट्स बाईक लॉन्च केली आहे. कंपनीने ही बाईक भारतीय बाजारात 13.61 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत लॉन्च केली आहे. ही मोटरसायकल भारतीय बाजारपेठेत CBU (कंप्लीट बिल्ट युनिट) म्हणून आणली जाईल. या बाईकचे नाव कटाना या जपानी शब्दावरून ठेवण्यात आले आहे, ज्याचा अर्थ तलवार असा आहे.
इंजिन आणि फीचर्स
999-cm3 पॉवरट्रेनसह नवीन 2022 कटाना बाईकमध्ये सुझुकीची इंटेलिजेंट राइड सिस्टम (SIRS) आहे. जी विविध प्रकारच्या प्रगत इलेक्ट्रॉनिक नियंत्रण प्रणालींसह येते. याचे इंजिन 148bhp पॉवर आणि 106Nm टॉर्क जनरेट करते. इंटेलिजेंट राइड सिस्टीममध्ये (SIRS) ट्रॅक्शन कंट्रोल, ड्राइव्ह मोड सिलेक्टर, राइड-बाय-वायर इलेक्ट्रॉनिक थ्रोटल सिस्टम आणि कमी RPM असिस्टचा समावेश आहे. ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम 5 मोड सेटिंग्ज (+ बंद) सह येते. नवीन ड्राइव्ह मोड सिलेक्टर (SDMS) तीन वेगवेगळ्या मोडमधील पर्याय देते. जे आउटपुट वैशिष्ट्ये बदलतात.
कंपनीने सांगितले की, गेल्या ऑटो एक्स्पोमध्ये ही बाईक सादर केल्यापासून, बाईकप्रेमींनी याबद्दल बरीच चौकशी केली आहे. कंपनीने गेल्या वर्षी मिलानमधील EICMA ऑटो शोमध्ये ही बाईक सादर केली होती. नवीन बाईक लाँचसह सुझुकी मोटरसायकल इंडियाचे देशात मोठे बाईक पोर्टफोलिओ मजबूत करण्याचे उद्दिष्ट आहे. सुझुकी मोटरसायकल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सतोशी उचिदा यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ''ही स्पोर्ट्स बाईक भारतात लॉन्च करण्यात आली कारण याला संभाव्य ग्राहकांकडून भरपूर सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आम्हाला खात्री आहे की, ही बाईक भारतातही आपला ठसा उमटवण्यास सक्षम ठरेल"
महत्वाच्या बातम्या :