Self balancing EV scooter: स्टँड लावायची कटकट संपली! मुंबईच्या कंपनीने बनवली जगातली पहिली 'सेल्फ बॅलन्सिंग स्कूटर'
Self balancing EV scooter: ऑटो एक्स्पो 2023 मध्ये मुंबई येथील दुचाकी उत्पादक कंपनी Liger Mobility आपली सेल्फ बॅलन्सिंग इलेक्ट्रिक स्कूटर प्रदर्शित करू शकते.
Self balancing EV scooter: ऑटो एक्स्पो 2023 मध्ये मुंबई येथील दुचाकी उत्पादक कंपनी Liger Mobility आपली सेल्फ बॅलन्सिंग इलेक्ट्रिक स्कूटर प्रदर्शित करू शकते. कंपनीने 2019 मध्ये आपली पहिली सेल्फ बॅलन्सिंग इलेक्ट्रिक स्कूटर समोर आणली होती. एका रिपोर्ट्सनुसार, आता ही स्कूटर उत्पादनासाठी तयार आहे.
Liger Mobility ची सेल्फ बॅलन्सिंग इलेक्ट्रिक स्कूटर रेट्रो स्टाइलिंगमध्ये आधुनिक फीचर्ससह येणार. ही स्कूटर Vespa प्रमाणेच डिझाइनमध्ये दिसणार. यात एक अद्वितीय डिझाइन एलईडी हेडलॅम्प आणि पुढील बाजूस एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स आहेत. स्कूटरमधील टर्न इंडिकेटर देखील LED मध्ये दिलेले आहेत. या सेल्फ बॅलन्सिंग इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ग्रॅब रेल, एलईडी टेल लाइट आणि समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क सस्पेंशनसह मोठी सीट देण्यात आली आहे. यात मॅट ब्लॅक फिनिशचे अलॉय व्हील आहेत. तसेच ब्रेकिंगसाठी पुढील बाजूस डिस्क आणि मागील बाजूस ड्रमचा वापर करण्यात आला आहे.
Self balancing EV scooter: स्टँडवर न लावता होणार पार्क
ही स्कूटर आपोआप बॅलन्स बनवते, त्यामुळे पार्किंग करताना स्टँडची गरज भासत नाही. ही स्कूटर बनवणार्या कंपनी Liger Mobility ने म्हटले आहे की, सेल्फ-बॅलेंसिंग स्कूटर राइडिंग सुरक्षित आणि चिंतामुक्त करते. ही स्कूटर आपोआपच बॅलन्स करत असल्याने पहिल्यांदा स्कूटर शिकणाऱ्यांना पडण्याचा धोका नाही. स्कूटरचे सेल्फ बॅलन्सिंग तंत्रज्ञान इतके प्रभावी आहे की ही, स्कूटर स्वार नसतानाही स्वतःचा बॅलन्स राखू शकते. म्हणजेच या स्कूटरवरून उतरून स्टँड लावला नाही तरी ही स्कूटर पडणार नाही. इतकेच नाही तर स्कूटरला जोरात धक्का लागल्यानंतरही स्कूटरचा तोल बिघडत नाही. अपघाताच्या वेळी हे तंत्रज्ञान खूप प्रभावी सिद्ध होऊ शकते आणि दुचाकी चालकांना रस्त्यावर पडून अपघात होण्यापासून वाचवता येईल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.
Self balancing EV scooter: व्हॉइस कमांड दिल्यावर स्कूटर पार्किंगमधून बाहेर येईल
सेल्फ बॅलेंसिंग तंत्रज्ञानाशिवाय ही स्कूटर तुमच्या व्हॉइस कमांडवरही काम करेल. स्कूटरला अॅडव्हान्स व्हॉईस कमांड फीचर देण्यात आले आहे. तुम्ही व्हॉईस कमांड देऊन स्कूटरला पार्किंगमधून बाहेर काढू शकता. सध्या कंपनीने या स्कूटरबद्दल मर्यादित माहिती शेअर केली आहे. ही स्कूटर 2023 च्या पहिल्या सहामाहीत भारतात लॉन्च केली जाऊ शकते.