Car : वाहनांच्या नंबर प्लेट लाल, पिवळ्या, हिरव्या, निळ्या आणि पांढऱ्या रंगांच्या का असतात? वाचा यामागचं कारण
Car Number Plates : पिवळ्या, हिरव्या, लाल आणि निळ्या नंबरप्लेट असलेल्या वाहनांसाठी भारतात काय नियम आहेत हे जाणून घ्या.
Car Number Plates : आपल्या घरात असणाऱ्या वाहनांची नंबर प्लेट पांढऱ्या रंगाची असते हे सर्वांनाच माहित आहे. परंतु अनेकदा तुम्हाला रस्त्यावर पिवळ्या, हिरव्या, निळ्या आणि लाल रंगाच्या नंबरप्लेट असलेली वाहनेही दिसतात. या नंबर प्लेट्स वेगवेगळ्या रंगाच्या का असतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? या ठिकाणी आम्ही तुम्हाला यामागचं खरं कारण सांगणार आहोत. यासोबतच पिवळ्या, हिरव्या, लाल आणि निळ्या नंबरप्लेट असलेल्या वाहनांसाठी भारतात काय नियम आहेत हे देखील आम्ही सांगणार आहोत.
पांढरी नंबर प्लेट असलेली कार
खासगी वापरासाठी असलेल्या वाहनांवरच पांढऱ्या रंगाच्या नंबर प्लेटचा वापर केला जातो. याचा अर्थ ती कार तुमच्या वैयक्तिक वापरासाठी तुम्ही घेतली आहे. जर तुम्ही वैयक्तिक वापरासाठी कार खरेदी करत असाल आणि ती डिझेल किंवा पेट्रोल किंवा सीएनजीवर चालत असेल तर तिची नंबर प्लेट पांढरी असेल. तुम्ही या कारच्या नंबर प्लेटचा रंग बदलू शकत नाही.
पिवळ्या नंबर प्लेटची कार
सार्वजनिक वाहनांवरच पिवळ्या रंगाच्या नंबरप्लेट लावल्या जातात, ज्यांचा व्यावसायिक वापर केला जातो. या सार्वजनिक वाहनांमध्ये बस, टॅक्सी, कॅब, ऑटो रिक्षा, बाईक टॅक्सी अशा गोष्टी येतात. याशिवाय व्यावसायिक मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर फक्त पिवळ्या रंगाच्या नंबरप्लेट लावल्या जातात. मात्र, पिवळ्या रंगाच्या नंबरप्लेटसह वाहने चालवणाऱ्या चालकांकडे व्यावसायिक वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे.
लाल नंबर प्लेट असलेली कार
लाल रंगाच्या नंबर प्लेट असलेल्या कार फक्त राष्ट्रपती आणि राज्यपाल वापरु शकतात. मात्र, त्यांच्या वाहनांच्या नंबरप्लेटवर क्रमांकाऐवजी अशोक चिन्ह असते. याशिवाय, कार निर्मात्याकडून चाचणी किंवा प्रमोशनसाठी रस्त्यावर लावलेल्या वाहनांवर लाल रंगाच्या नंबर प्लेटही लावल्या जातात.
हिरव्या रंगाची नंबर प्लेट असलेली कार
भारतात अलीकडे हिरव्या नंबर प्लेट असलेली वाहने दिसू लागली आहेत. वास्तविक, याचे कारण म्हणजे हिरव्या नंबर प्लेटचा वापर फक्त इलेक्ट्रिक वाहनांसाठी केला जातो. या ठिकाणी खासगी आणि व्यावसायिक वाहनांमध्येही फरक आहे. खाजगी इलेक्ट्रिक वाहनांवर हिरव्या रंगाच्या नंबर प्लेट्स लावल्या जाऊ शकतात. परंतु, त्यांचा नंबर पांढऱ्या रंगात लिहिलेला असतो. दुसरीकडे, व्यावसायिक इलेक्ट्रिक वाहनांवरील क्रमांक पिवळ्या रंगात लिहिलेले असतात.
निळ्या रंगाची नंबर प्लेट असलेली कार
निळ्या रंगाची नंबर प्लेट असलेली कार भारतात खरेदी करण्यात आली आहे. त्यामागचे कारण असे की या नंबर प्लेट्स फक्त त्या वाहनांवर लावल्या जातात ज्या परदेशी प्रतिनिधींसाठी वापरतात. भारतात कुठेही निळ्या रंगाची नंबर प्लेट असलेले वाहन दिसले तर समजावे की त्यात परदेशी राजदूत किंवा मुत्सद्दी प्रवास करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :