(Source: ECI/ABP News/ABP Majha)
New Cars in December 2023 : डिसेंबरमध्ये भारतात होणार 'या' दोन कारची ग्रँड एन्ट्री; पाहा स्पेसिफिकेशन डिटेल्स
New Cars in December 2023 : डिसेंबर 2023 मध्ये नवी कार्स : या वर्षाच्या अखेरीपूर्वी 2 नवीन (New Cars) कार भारतीय बाजारात लाँच होणार आहेत. ज्यात नवीन किआ सोनेट फेसलिफ्ट, लेक्सस एलएम एमपीव्हीचा समावेश आहे.
New Cars in December 2023 : डिसेंबर 2023 मध्ये दोन नवीन (New Cars) कार भारतीय बाजारात लाँच होणार आहेत. ज्यात नवीन किआ सोनेट फेसलिफ्ट, लेक्सस एलएम एमपीव्हीचा समावेश आहे. या दोन्ही कारला भन्नाट फिचर्स देण्यात आले आहेत. शिवाय या आधीच्या मॉडेल्सला चांगली पसंती मिळाल्यामुळे आता नव्या रुपात पाहायला मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या नव्या कारमध्ये काय पाहायला मिळणार आहे.
किआ सोनेट फेसलिफ्ट (Kia Sonet Facelift )
कोरियन वाहन निर्माता किआ आपली सोनेट फेसलिफ्ट एसयूव्ही 15 डिसेंबर 2023 ला लाँच करणार आहे. सोनेट फेसलिफ्टची भारतात बऱ्याच काळापासून प्रतीक्षा आहे. 2024 किआ सोनेटमध्ये कॉस्मेटिक डिझाइनबदल आणि फीचर लोडेड केबिन मिळेल. मात्र, सध्याचा पॉवरट्रेनचा पर्याय कायम ठेवण्यात येणार आहे. यात एडीएएस तंत्रज्ञानाचाही समावेश करण्यात येणार आहे. 2024 किआ सोनेट फेसलिफ्टमध्ये 82 बीएचपी, 1.2 लीटर 4-सिलिंडर एनए पेट्रोल, 118 बीएचपी, 1.0-लीटर 3-सिलिंडर टर्बो पेट्रोल आणि 115 बीएचपी, 1.5-लीटर 4-सिलिंडर टर्बो डिझेल इंजिन सह 3 इंजिन पर्याय उपलब्ध असतील. यात 5-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड आयएमटी (इंटेलिजंट मॅन्युअल ट्रान्समिशन), 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक आणि 7-स्पीड ड्युअल क्लच ऑटोमॅटिक (डीसीटी) मिळेल.
लेक्सस एलएम एमपीव्ही (Lexus LM MPV)
लेक्सस इंडिया या महिन्याच्या अखेरीस आपला एलएम प्रीमियम एमपीव्ही लाँच करण्याची शक्यता आहे. लेक्ससने ऑगस्ट 2023 मध्ये एलएम लक्झरी एमपीव्हीसाठी प्री-ऑर्डर घेण्यास सुरुवात केली आणि कंपनीला आतापर्यंत 100 हून अधिक बुकिंग प्राप्त झाले आहेत. 2024 लेक्सस एलएम एमपीव्ही टोयोटाच्या जीए-के प्लॅटफॉर्मवर आधारित असेल आणि 4 आणि 7-सीटर पर्यायांसह सिंगल टॉप-स्पेक 350 एच व्हेरिएंटमध्ये सादर केली जाईल. या नव्या एमपीव्हीमध्ये 48 इंचाची स्क्रीन, रेक्लाइनर सीट, 23 स्पीकर सराउंड-साऊंड कप, दुसऱ्या रांगेसाठी फूटरेस्ट, एम्बियंट लाइटिंग सिस्टीम आणि एडीएएस टेक्नॉलॉजी चा समावेश आहे. यात 2.5 लीटर 4 सिलिंडर पेट्रोल हायब्रिड इंजिन मिळेल जे सीव्हीटी गिअरबॉक्ससह 190 बीएचपी पॉवर आणि 240 एनएम टॉर्क जनरेट करते.
या दोन्ही कारमध्ये अॅडव्हान्स फिचर्स देण्यात आले आहेत. भारतील बाजारात या गाड्या अव्वल ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दोन्ही कार बाजारात कधी येणार?, याची कार चाहते वाट बघत आहे.
इतर महत्वाची बातमी-
2024 Renault Duster: New Generation Renault Duster चे फिचर्स लीक, कशी असेल नवी Renault Duster?