एक्स्प्लोर

Toyota Glanza चा नवीन व्हेरिएंट लाँच, दमदार इंजिनसह मिळणार हे पॉवरफुल फीचर्स

जपानी वाहन उत्पादक कंपनी टोयोटाने आपल्या Glanza कारचा नवीन व्हेरिएंट भारतात लॉन्च केला आहे. कंपनीने ही कार मारुती सुझुकी बलेनो लॉन्च झाल्याच्या काही आठवड्यांनंतर भारतात सादर केली आहे.

New Toyota Glanza: जपानी वाहन उत्पादक कंपनी टोयोटाने आपल्या Glanza कारचा नवीन व्हेरिएंट भारतात लॉन्च केला आहे. कंपनीने ही कार मारुती सुझुकी बलेनो लॉन्च झाल्याच्या काही आठवड्यांनंतर भारतात सादर केली आहे. कंपनीने काही आठवड्यांपूर्वीच याची प्री-बुकिंग देखील सुरू केली होती. ग्राहक कंपनीच्या अधीकृत डीलरशिप किंवा वेबसाइटद्वारे 11 हजार रुपयांच्या टोकन रक्कमसह ही कार बुक करू शकतात. कंपनीने याचे 4 व्हेरियंट लॉन्च केले आहेत. यात E, S, G आणि V यांचा समावेश होतो. या कारमध्ये ग्राहकांना फक्त पेट्रोल इंजिनचा पर्याय मिळतो.

इंजिन आणि पॉवर 

नवीन Toyota Glanza मध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 90hp पॉवर आणि 113 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड एएमटी ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह लॉन्च करण्यात आले आहे. ही AMT गिअरबॉक्ससह येणारी टोयोटाची भारतातील पहिली कार आहे.

फीचर्स आणि डिझाइन

नवीन ग्लान्झा आणि बलेनोमध्ये बरेच फीचर्स एकसारखे आहेत. यामधील बरेच फीचर्स याच्या जुन्या मॉडेलमध्ये ही देण्यात आले आहेत. कंपनीने आपल्या या नवीन कारमध्ये Camry ग्रिल, एक स्पोर्टियर फ्रंट बंपर, नवीन हेडलाइट्स आणि LED डेटाइम रनिंग लाईट ग्राफिक्स सारखे फीचर्स दिले आहेत. याच्या आतील भागात ही बलेनोशी मिळतेजुळते फीचर्स दिले आहेत. याचे आतील डिझाइन आणि लेआउट देखील अगदी बलेनो सारखेच आहे. यात एक लेयर्ड डॅशबोर्ड, फ्री-स्टँडिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि स्टीयरिंग व्हील डिझाइन ही मिळते. याच्या इंटिरियरमध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे संपूर्ण कॅबिनमध्ये ब्लॅक आणि बेन्झ रंग पाहायला मिळतो. 

यात हेड-अप डिस्प्ले (HUD), 360-डिग्री कॅमेरा, अँड्रॉइड ऑटो आणि Apple CarPlay सपोर्टसह 9.0-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 'टोयोटा आय-कनेक्ट', ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, टिल्ट, टेलिस्कोपिक ऍडजस्टमेंटसह स्टीयरिंग आणि 6 एअरबॅग सारखे फीचर्स ही ग्राहकांना मिळणार आहेत. कंपनी यासोबतच 3 वर्षे किंवा 1 लाख किमीची वॉरंटी देत ​​आहे. तसेच याची वॉरंटी 5 वर्षे किंवा 2.20 लाख किमीपर्यंत वाढवता येते.

नवीन Glanza चे बेस व्हेरिएंट जुन्या बेस व्हेरियंटपेक्षा फक्त 4,000 रुपयांनी महाग आहे. तसेच याचा टॉप व्हेरिएंट जुन्या मॉडेलपेक्षा फक्त 20,000 रुपये जास्त महाग आहे. Glanza प्रीमियम श्रेणीत लॉन्च होणारी नवीन हॅचबॅक आहे. भारतात याची स्पर्धा मारुतीच्या बलेनो, टाटा मोटर्स अल्ट्रोझ आणि ह्युंदाईच्या i20 शी होणार आहे.

व्हेरिएंट आणि किंमत 

Variants

MT

AMT

Toyota Glanza E

Rs. 6,39,000

-

Toyota Glanza S

Rs. 7,29,000

Rs. 7,79,000

Toyota Glanza G

Rs. 8,24,000

Rs. 8,74,000

Toyota Glanza V

Rs. 9,19,000

Rs. 9,69,000

महत्त्वाच्या इतर बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मालाडमध्ये धक्कादायक घटना, मदरशातच 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन, मालवणी पोलिसांचा तपास सुरु
मालाडमध्ये धक्कादायक घटना, मदरशातच 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन, मालवणी पोलिसांचा तपास सुरु
WTC 2025 Final:दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत दाखल,जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत कितव्या स्थानी?   
दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत दाखल,जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत कितव्या स्थानी?   
वाल्मिक कराड CID पोलिसांना शरण येणार; राजकीय, सामाजिक दवाब वाढल्याने तपासाला वेग
वाल्मिक कराड CID पोलिसांना शरण येणार; राजकीय, सामाजिक दवाब वाढल्याने तपासाला वेग
सेबीनं 15000 वेबसाइटस अन् सोशल मीडिया स्टार्सवर बंदी घालत दिला दणका, शेअर मार्केट गुतवणुकीबाबत चुकीचा सल्ला देणं भोवलं
शेअर मार्केट गुंतवणूक सल्ला देणाऱ्या वेबसाइट अन् सोशल मीडिया स्टार्सवर सेबीची बंदी, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ethiopian Airlines Accidents : इथिओपियात विमान दुर्घटनाग्रस्त, 157 ठारABP Majha Marathi News Headlines 10PM TOP Headlines 10 PM 29 December 2024Navi Mumbai : मुंबई ते नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडणार,सिडकोचा महत्वाकांक्षी प्रकल्पWalmik Karad Profile : कोण आहेत वाल्मीक कराड? आतापर्यंतचा इतिहास काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मालाडमध्ये धक्कादायक घटना, मदरशातच 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन, मालवणी पोलिसांचा तपास सुरु
मालाडमध्ये धक्कादायक घटना, मदरशातच 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन, मालवणी पोलिसांचा तपास सुरु
WTC 2025 Final:दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत दाखल,जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत कितव्या स्थानी?   
दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत दाखल,जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत कितव्या स्थानी?   
वाल्मिक कराड CID पोलिसांना शरण येणार; राजकीय, सामाजिक दवाब वाढल्याने तपासाला वेग
वाल्मिक कराड CID पोलिसांना शरण येणार; राजकीय, सामाजिक दवाब वाढल्याने तपासाला वेग
सेबीनं 15000 वेबसाइटस अन् सोशल मीडिया स्टार्सवर बंदी घालत दिला दणका, शेअर मार्केट गुतवणुकीबाबत चुकीचा सल्ला देणं भोवलं
शेअर मार्केट गुंतवणूक सल्ला देणाऱ्या वेबसाइट अन् सोशल मीडिया स्टार्सवर सेबीची बंदी, नेमकं काय घडलं?
ना भारत, ना ऑस्ट्रेलिया, अशी एक शक्यता तिसराच संघ WTC फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार? जाणून घ्या समीकरण
ना भारत, ना ऑस्ट्रेलिया, अशी एक शक्यता तिसराच संघ WTC फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार? जाणून घ्या समीकरण
5 लाखात बांगलादेशी नागरिकास बनवायचा भारतीय, बनावट पासपोर्टद्वारे पाठवायचा परदेशात; कसं फुटलं बिंग?
5 लाखात बांगलादेशी नागरिकास बनवायचा भारतीय, बनावट पासपोर्टद्वारे पाठवायचा परदेशात; कसं फुटलं बिंग?
Kalyan Crime : कल्याण अत्याचार व हत्या प्रकरणात सरकारकडून नियुक्ती होताच उज्वल निकम म्हणाले, ताबडतोब शिक्षा होणं...
कल्याणच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार व हत्या प्रकरणात उज्वल निकम बाजू मांडणार, मुख्यमंत्र्यांकडून नियुक्तीचा फोन
Shani Dev : पुढचे 89 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 3 राशींना सोन्याचे दिवस, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
पुढचे 89 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 3 राशींना सोन्याचे दिवस, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Embed widget