Toyota T-Connect Data Leak: सावधान! Toyota च्या 2.96 लाख ग्राहकांचा डेटा लीक, अनेकांना मिळू शकतात स्कॅम ईमेल
Toyota Data Leak: टोयोटाचे वाहन खरेदी केलेल्या ग्राहकांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. टोयोटाच्या लाखो ग्राहकांची खासगी माहिती चोरीला गेली आहे. याबाबत स्वतः कंपनीने आपल्या अधीकृत वेबसाईटवर माफी मागत ही माहिती दिली आहे.
Toyota Data Leak: टोयोटाचे वाहन खरेदी केलेल्या ग्राहकांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. टोयोटाच्या लाखो ग्राहकांची खाजगी माहिती चोरीला गेली आहे. याबाबत स्वतः कंपनीने आपल्या अधीकृत वेबसाईटवर माफी मागत ही माहिती दिली आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटर्सने शुक्रवारी आपल्या अधीकृत वेबसाईटवर डेटा लीक झाल्याची माहिती देत सांगितलं की, T-Connect सेवा वापरणाऱ्या सुमारे 296,000 ग्राहकांची माहिती लीक झाली आहे.
फिशिंग ईमेलपासून सावधान (Beware Of Phishing Emails)
माहिती लीक झाल्यानंतर टोयोटाने आपल्या ग्राहकांना सतर्क करण्यासाठी एक निवेदन जारी केले आहे. ज्यात सांगण्यात आले आहे की, डेटा लीक झाल्यानंतर अनेक ग्राहकांना त्यांच्या ईमेल आयडीवर स्पॅम, फिशिंग स्कॅम किंवा अनपेक्षित ईमेल संदेश प्राप्त होण्याची शक्यता आहे. यापासून सावध राहण्याचे कंपनीने आपल्या ग्राहकांना आवाहन केले आहे.
तत्पूर्वी टोयोटाने दिलेल्या माहितीनुसार, T-Connect सेवेचा वापर करणाऱ्या एकूण 296,019 ग्राहकांचे ईमेल आणि यूजर नंबर लीक झाले आहेत. T Connect ही एक टेलिमॅटिक्स सेवा आहे, जी कार आणि कारचालकाला नेटवर्कद्वारे कनेक्ट ठेवते. यालाच हॅक करून डेटा लीक झाला असावा, असं सांगण्यात येत आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, असं असलं तरी ग्राहकांची नावे, फोन नंबर किंवा क्रेडिट कार्डशी संबंधित कोणतीही संवेदनशील माहिती लीक होण्याची शक्यता नाही. कंपनीने हा दावा केला असला तरी टी-कनेक्ट सेवेमध्ये युजर्सची अनेक वैयक्तिक माहिती असते.
2017 ते 2022 पर्यंतच्या ग्राहकांचा डेटा लीक (Toyota Consumer Data Leaks From 2017 To 2022)
कंपनीने सांगितले आहे की, आम्ही पुष्टी केली आहे की, T-Connect यूजर्सचा साईट सोर्स कोडचा भाग (text describing computer processing) GitHub (software development platform) प्रकाशित करण्यात आला आहे. यात अशी माहिती समोर आली आहे की, कंपनीच्या डिसेंबर 2017 ते 15 सप्टेंबर 2022 च्या ग्राहकांचा सोर्स कोडचा भाग लीक झाला आहे. यानंतर कंपनीने GitHub वर यूजर्सचा साईट सोर्स कोडला ताबडतोब खाजगी केल्याचं सांगितलं आहे.
GitHub काय आहे?
GitHub ही एक सॉफ्टवेअर कंपनी आहे. जर तुम्ही वेब डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, Ethical Hacking, Coding Language शिकत असाल किंवा या क्षेत्रात काम करत असाल तर तुम्हाला GitHub.com कडून खूप मदत मिळू शकते. यावर तुम्हाला फक्त तेच लोक मिळतील, जे Web Development, Software Development, Hacking, Coding किंवा GitHub मध्ये काम करताना.