एक्स्प्लोर

Car Comparison : Honda Elevate, Hyundai Creta, Kia Seltos की Maruti Grand Vitara? कोणती कार सर्वात बेस्ट? वाचा माहिती

Car Comparison : Honda ने अलीकडेच नवीन मध्यम आकाराच्या SUV Elevate च्या किमती जाहीर केल्या आहेत.

Honda Elevate vs Hyundai Creta vs Kia Seltos vs Maruti Grand Vitara : Honda ने अलीकडेच नवीन मध्यम आकाराच्या SUV Elevate च्या किमती जाहीर केल्या आहेत. त्याची एक्स-शोरूम किंमत 11 लाख रुपयांपासून सुरू होते, जी त्याच्या टॉप-एंड व्हेरिएंटसाठी 16 लाखांपर्यंत जाते. नवीन Honda Elevate SUV बाजारात Hyundai Creta, Kia Seltos, Volkswagen Taigun, Skoda Kushaq, Maruti Grand Vitara, Toyota Hyrider आणि MG Astor यांच्याशी स्पर्धा करणार आहे. एलिव्हेट फक्त नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनसह उपलब्ध आहे. तर इतर सर्व प्रतिस्पर्धी टर्बो पेट्रोल, डिझेल आणि मजबूत हायब्रिडसह अनेक इंजिन पर्याय देतात. तर आज आपण Elevate, Creta, Seltos आणि Grand Vitara च्या पेट्रोल इंजिनच्या किमतींची तुलना करून सांगणार आहोत.

इंजिन कसे असेल?

Honda Elevate ला 1.5-liter 4-सिलेंडर नॅचरली-एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन मिळते, जे सिटी सेडानमध्ये देखील वापरले जाते. हे इंजिन 121 PS पॉवर आणि 145 Nm टॉर्क जनरेट करू शकते. यात 6-स्पीड मॅन्युअल आणि 7-स्पीड CVT ट्रान्समिशनचा पर्याय आहे.

सेल्टोस आणि क्रेटाला 1.5-लिटर इंजिन मिळते, जे 115 PS पॉवर आणि 145 Nm टॉर्क जनरेट करते. गिअरबॉक्स पर्यायांमध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि CVT ट्रान्समिशन समाविष्ट आहे.

ग्रँड विटारा 1.5-लिटर नैसर्गिकरित्या-एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनसह येते, जे 103bhp पॉवर आणि 137Nm टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत माईल्ड हायब्रीड सिस्टीम उपलब्ध आहे. त्यामुळे जास्त मायलेज मिळते. यात 6-स्पीड मॅन्युअल आणि टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय मिळतो.

किंमत किती असेल?

  • एलिव्हेट एसयूव्ही 4 ट्रिम स्तरांमध्ये ऑफर केली जाते - SV, V, VX आणि ZX. बेस SV ट्रिम वगळता, सर्व तीन ट्रिम्स मॅन्युअल आणि CVT गिअरबॉक्स पर्याय आहेत.
  • Honda Elevate च्या मॅन्युअल आवृत्तीची किंमत 11 लाख ते 14.90 लाख रुपये आहे, तर CVT आवृत्तीची किंमत V CVT साठी 13.21 लाख रुपये आणि टॉप-स्पेक ऑटोमॅटिक पर्यायासाठी 16 लाख रुपये आहे.
  • Hyundai Creta च्या मॅन्युअल व्हर्जनची किंमत 10.87 लाख ते 15.17 लाख रुपये आहे, तर ऑटोमॅटिक व्हर्जनची एक्स-शोरूम किंमत 16.33 लाख ते 17.89 लाख रुपये आहे. 
  • तर, बेस पेट्रोल मॅन्युअलसाठी सेल्टोसची किंमत 10.90 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप-एंड पेट्रोल मॅन्युअलसाठी 15.20 लाखांपर्यंत जाते. तर त्याच्या ऑटोमॅटिक वेरिएंटची किंमत 16.20 लाख रुपये आहे.
  • मारुती ग्रँड विटाराच्या लाईट-हायब्रीड व्हर्जनची मॅन्युअल ट्रान्समिशनसाठी किंमत 10.70 लाख रूपये ते 17.07 लाख रूपयां दरम्यान आहे, तर ऑटोमॅटिक व्हर्जनची एक्स-शोरूम किंमत 13.60 लाख रूपयांपासून ते 17.07 लाखां दरम्यान आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

Bikes Sales September 2023 : सुझुकी मोटरसायकलने देशांतर्गत केली सर्वाधिक विक्री, वाचा सविस्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hemant Nimbalkar : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
हेमंत निंबाळकर : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
Santosh Deshmukh Case : माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल
संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vaibhavi Deshmukh Dharashiv : हुंदका दाटला, डोळे भरले! बापासाठी लेकीचं भाषणच वैभवी देशमुख UNCUTABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 11 January 2025Sandeep Kshirsagar Dharashiv Speech : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्याशिवाय शांत बसणार नाहीVasai Jewellers Robbery CCTV : हेल्मेट घालून आले थेट बंदूक काढली, ज्वेलर्स दुकानातील दरोड्याचा थरार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hemant Nimbalkar : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
हेमंत निंबाळकर : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
Santosh Deshmukh Case : माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल
संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
Beed: बीडमध्ये स्त्री-भ्रूण हत्येचा परिणाम, मुलींचा जन्मदर घटला; 1000 मुलांमागे केवळ 865 मुली
Beed: बीडमध्ये स्त्री-भ्रूण हत्येचा परिणाम, मुलींचा जन्मदर घटला; 1000 मुलांमागे केवळ 865 मुली
IPO : पैसे तयार ठेवा, 2025 मध्ये शेअर बाजारात आयपीओची रांग लागणार,90 कंपन्यांकडून ड्राफ्ट दाखल
गुंतवणूकदारांसाठी कमाईची मोठी संधी,शेअर बाजारात 2025 मध्ये आयपीओचं जोरदार लिस्टींग...
69 वर्षीय आजोबांचा नाद खुळा; संभाजीनगरहून सुरुवात, पूर्ण केली 4000 किमी सायकल वारी; तरुणाईला मोलाचा संदेश
69 वर्षीय आजोबांचा नाद खुळा; संभाजीनगरहून सुरुवात, पूर्ण केली 4000 किमी सायकल वारी; तरुणाईला मोलाचा संदेश
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
Embed widget