Elon Musk : ...तोपर्यंत भारतात 'टेस्ला' कार येणार नाही, एलॉन मस्क यांचा मोठा निर्णय
Tesla in India : टेस्ला मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी भारत जोपर्यंत टेस्लाने (Tesla Electric Cars) बनवलेल्या कार भारतात विकण्याची परवानगी देत नाही तोपर्यंत भारतात नव्या कार बनवणार नसल्याचं सांगितलं आहे.
Elon Musk on Tesla : गेल्या वर्षभरापासून भारतीय बाजारपेठेत टेस्लाची इलेक्ट्रिक कार (Tesla Electric Car) आणण्यासाठी टेस्लाकडून प्रयत्न सुरु होते. पण आता टेस्ला कार भारतीय बाजारपेठेत आणण्याचा निर्णय एलॉन मस्क यांनी स्थगित केला आहे. त्यामुळे भारतीयांनी टेस्ला इलेक्ट्रीक कारची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. भारत जोपर्यंत टेस्लाने बनवलेल्या कार भारतात विकण्याची परवानगी देत नाही तोपर्यंत भारतात नव्या कार बनवणार नसल्याचं सांगितलं आहे. मस्क यांनी शुक्रवारी ट्विट करत या मोठ्या निर्णयाबद्दल माहिती दिली आहे. त्यामुळे टेस्ला इलेक्ट्रीक कार वापरण्याचं भारतीयांची इच्छा आता अपुरी राहणार असल्याचं चित्र आहे.
भारत सरकारने टेस्लाला परवानगी देण्यासाठी अट ठेवली आहे. टेस्ला भारतात तयार केलेल्या इलेक्ट्रिक कारचं भारतात विकू शकेल अशी भारत सरकारची भूमिका आहे. पण टेस्लाला आधी चीनमध्ये तयार केलेल्या कार भारतात विकून भारतीय बाजारपेठेचा अंदाज घ्यायचा असल्याचं म्हटलं आहे. यावरून भारत सरकार आणि टेस्ला यांच्यात बऱ्याच काळापासून प्रस्ताव रखडला आहे.
Tesla will not put a manufacturing plant in any location where we are not allowed first to sell & service cars
— Elon Musk (@elonmusk) May 27, 2022
आयात शुल्कावरून टेस्ला आणि सरकार आमनेसामने
आयात शुल्क कमी करण्याबाबतचा टेस्ला आणि सरकार यांच्यातील करार बऱ्याच दिवसांपासून रखडला आहे. या वाटाघाटीवर सुमारे एका वर्षाहून अधिक काळापासून बोलणी सुरु आहेत. मस्क यांची इच्छा आहे की, सरकारने भारतात टेस्लाचा कारखाना सुरू करण्यापूर्वी त्यांनी बनवलेल्या इलेक्ट्रिक कार भारतात आणण्यावर आयात करातून सूट द्यावी. यामुळे टेस्लाला भारतीय बाजारपेठेतील त्यांच्या कारची मागणी आणि प्रतिसाद तपासता येईल.
मात्र, टेस्लाला भारतात कार विकायच्या असतील तर भारतात कारखाना सुरू करावा लागेल, असं भारत सरकारनं स्पष्ट केलं आहे. त्यासाठी टेस्ला भारत सरकारच्या PLI योजनेचा लाभ घेऊ शकते. चीनमध्ये बनवलेल्या टेस्लाच्या इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारात विकल्या जाणार नाहीत, असं भारतानं स्पष्ट केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या