Tata Tiago EV आली, देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारमध्ये मिळणार हे फीचर्स, जाणून घ्या किंमत
Tata Tiago EV Launched: गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेली टाटा मोटोर्सची इलेक्ट्रिक कार Tata Tiago अखेर आज भारतात लॉन्च झाली आहे. ही देशातील सर्वात स्वस्त कार आहे. या कारची प्रतीक्षा अनेक ग्राहक करत होते.
Tata Tiago EV Launched: गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेली टाटा मोटोर्सची इलेक्ट्रिक कार Tata Tiago अखेर आज भारतात लॉन्च झाली आहे. ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार (cheapest electric car) आहे. या कारची प्रतीक्षा अनेक ग्राहक करत होते. या कारमुळे सामान्य माणसाचं इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. ही कार फक्त दिसायला जबरदस्त नाही, तर यामध्ये कंपनीने आधुनिक फीचर्स देखील दिले आहे. सणासुदीचा हंगाम सुरु झाला असताना कंपनीने ही कार लॉन्च केल्याने याची अधिक विक्री होणार, अशी कंपनीला अपेक्ष आहे. ग्राहक फक्त 8.49 लाख रुपयांना (Tata Tiago Ev Price) ही कार खरेदी करू शकतात. ग्राहक ही कार 10 ऑक्टोबरपासून बुक करू शकतात. तसेच याची डिलिव्हरी जानेवारी 2023 पासून सुरू होईल. चला तर या नवीन कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.
Tata Tiago च्या पेट्रोल मॉडेलपेक्षा यात थोडे बदल करण्यात आले आहेत. या नवीन कारला डॅशबोर्ड आणि ड्युअल रंगासह सादर करण्यात आलं आहे. याच्या आतील भागात प्रीमियम लेदर सीट्स कव्हर देण्यात आले आहे. हरमनची इन्फोटेनमेंट सिस्टम, अधिक चांगल्या क्वालिटीचे सीट कुशन देण्यात आले आहेत. या कारचा बेसिक प्लॅटफॉर्म पूर्वीसारखाच आहे.
किती देणार रेंज?
Tata Tiago EV कारमध्ये देण्यात आलेली इलेक्ट्रिक मोटर 74 BHP ची पॉवर आणि 170 NM टॉर्क जनरेट करते. जे 26kWh च्या बॅटरीक पॅकसह जोडण्यात आले आहे. ही इलेक्ट्रिक कार सिंगल चार्जमध्ये 310 किमीची रेंज देण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. तसेच यात फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे. ज्याच्या मदतीने ही कार फक्त एक तासात 0 ते 80 टक्के चार्ज होते. कंपनीने यात Z Connect सह स्मार्टवॉच कनेक्टिव्हिटी, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मल्टीपल ड्राइव्ह मोड, फॉग लॅम्प, मल्टी-मोड रीजन फंक्शन, फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील, क्रूझ कंट्रोल, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम सारखे फीचर्स देण्यात आले आहे.
किंमत
Tata Tiago EV ही भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. कंपनीच्या या नवीन इलेक्ट्रिक कारची एक्स-शोरूम किंमत 8.49 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 11.79 रुपयांपर्यंत जाते. टाटा टियागो ही ईव्ही हॅचबॅक सेगमेंटमधील देशातील पहिली इलेक्ट्रिक कार आहे. ज्यामुळे बाजारात अद्याप या कारला फारशी स्पर्धा नाही. पण येत्या काळात या सेगमेंटमध्ये इतर इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या जाऊ शकतात.