Tata Motors Price Hike: Tata Motors च्या व्यावसायिक वाहनांच्या किंमतीत 1 एप्रिलपासून होणार वाढ, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Tata Motors Price Hike: भारतीय वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे.
Tata Motors Price Hike: भारतीय वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. ही वाढ 5% पर्यंत असू शकते. वाढीव किमती 1 एप्रिल 2023 पासून लागू होतील. किंमत वाढीचं मोठं कारण म्हणजे BS6 फेज 2 निकष असून कंपनी आपले वाहने अपडेट करत आहेत. कंपनीच्या या निर्णयामुळे किती वाढू शकते किंमत, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ...
Tata Motors Price Hike: नवीन RDE मानदंडांसह अधिक चांगले तंत्रज्ञान उपलब्ध होईल
कंपनी आपल्या पोर्टफोलिओमधील सर्व वाहने नवीन नियमांनुसार बदलण्याच्या प्रक्रियेत आहे. यामुळे ग्राहक आणि वाहनधारक स्वच्छ, नीटनेटके आणि चांगल्या तंत्रज्ञानाची अपेक्षा करू शकतात. त्यामुळे ग्राहकांना कमी खर्चात अधिक फायदे मिळू शकतील.
Tata Motors Price Hike: सर्व व्यावसायिक वाहनांच्या किमती वाढतील
टाटा मोटर्सने दिलेल्या माहितीनुसार, वाढलेल्या किमती कंपनीच्या सर्व व्यावसायिक वाहनांवर लागू होतील. जे मॉडेल आणि प्रकारानुसार बदलतील. दुसरीकडे BS6 फेज 2 स्वीकारल्यामुळे सर्व वाहन उत्पादक त्यांची वाहने RDE नॉर्म्स आणि E20 अनुरूप बनवण्यात गुंतले आहेत. त्यामुळे वाहनांच्या किमती वाढणे स्वाभाविक आहे.
Tata Motors Price Hike: टाटाने रेड डार्क एडिशन केलं सादर
अलीकडेच, कंपनीने काही बदलांसह आपली टाटा सफारी हॅरियर आणि नेक्सन रेड डार्क नेक्सॉनमध्ये सादर केली आहे. ज्यामध्ये टाटा सफारी रेड डार्क एडिशनची किंमत 22.61 लाख ते 22.71 लाख रुपये आहे, तर हॅरियर रेड डार्क एडिशनची किंमत 21.77 लाख रुपये आणि टाटा नेक्सन रेड डार्क एडिशनची (पेट्रोल) किंमत 12.35 लाख रुपये आहे. तर डिझेल व्हेरियंटची किंमत 13.70 लाख रुपये आहे. सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत. या आवृत्तीच्या गाड्या ऑनलाइन बुक केल्या जाऊ शकतात किंवा टाटाच्या अधिकृत डीलरशिपला भेट देऊन 30,000 च्या रकमेवर बुक करता येतात.
नवीन टाटा हॅरियरची बुकिंग सुरु
दरम्यान, टाटा मोटर्सने आपल्या आगामी अपडेटेड मॉडेल 2023 हॅरियर एसयूव्हीसाठी बुकिंग सुरू केली आहे. नवीन अपडेटेड हॅरियरच्या बाहेरील भागात कोणतेही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले नाहीत, परंतु केबिन आणि सेफ्टी फीचर्समध्ये सर्वात मोठे बदल करण्यात आले आहेत. नवीन हॅरियर आता ADAS प्रणालीने सुसज्ज असेल. यासोबतच यामध्ये इतरही अनेक बदल करण्यात आले आहेत. 2023 Tata Harrier ला लेव्हल 2 ADAS सिस्टीम देखील मिळेल. ज्यामध्ये फ्रंट टक्कर अलर्ट, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेक, ट्रॅफिक साइन रेकग्निशन, हाय-बीम असिस्ट, लँड डिपार्चर वॉर्निंग, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, लेन चेंज अलर्ट यासारख्या फीचर्सचा समावेश आहे.