Tata Motors cuts EV prices : टाटा कंपनीच्या 'या' ईव्ही गाड्यांच्या किंमती थेट लाख रुपयांनी उतरल्याने ग्राहकांसाठी लाॅटरी!
Nexon.ev आणि Tiago.ev च्या किमतींमध्ये मोठी कपात केल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कंपनीकडून किंमतीमध्ये कपात करत ईव्ही अधिकाधिक भारतीय ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.
Tata Motors cuts EV prices : टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडकडून भारतातील त्यांच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या ईव्ही Nexon.ev आणि Tiago.ev च्या किमतींमध्ये मोठी कपात केल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कंपनीकडून किंमतीमध्ये कपात करत ईव्ही अधिकाधिक भारतीय ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.
- टाटा कंपनीकडून ईव्ही गाडीच्या किंमती जवळपास 1.2 लाख रुपयांनी कमी केल्या
- ग्राहकांना बॅटरीवरील गाड्यांच्या किंमती कमी करत फायदे देण्याचा प्रयत्न
- Nexon.ev (465 किमी) ची किंमत आता 11.49 लाख रूपयांपासून सुरुवात
- लॉंग रेंज (465 किमी) ची किंमत आता 16.99 लाख रूपयांपासून
- Tiago.ev ची किंमत आता 7.99 लाख रूपयांपासून
Nexon.ev आणि Tiago.ev अधिकाधिक ग्राहकांसाठी लक्षवेधी ठरतील
किंमती कपातीबाबत टीपीईएमचे चीफ कमर्शियल ऑफिसर विवेक श्रीवत्स म्हणाले की, ''ईव्हीच्या एकूण किमतीमध्ये बॅटरी खर्चांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. नजीकच्या काळात बॅटरी सेल किंमती स्थिर होण्यासह भविष्यात किमतींमध्ये संभाव्य कपात पाहता आम्ही ग्राहकांना फायदे देण्याचे पाऊल उचलले आहे. ईव्हींमध्ये गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढ झाल्याने आमच्या ईव्हींना देशभरात अधिक प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे मिशन आहे. आमचा विश्वास आहे की या किफायतशीर किंमतीसह Nexon.ev आणि Tiago.ev अधिकाधिक ग्राहकांसाठी लक्षवेधी ठरतील', असेही त्यांनी म्हटले आहे.
एकूण प्रवासी वाहन उद्योग विकासामध्ये मोठे योगदान देत आहेत. कॅलेंडर वर्ष 2023 मध्ये ईव्ही विभागाने पीव्ही उद्योगाने नोंद केलेल्या 8 टक्के वाढीच्या तुलनेत 90 टक्क्यांहून अधिक वाढ केली. ही विकासगती कॅलेंडर वर्ष 2024 मध्ये देखील सुरू आहे, जेथे ईव्ही विक्रीने जानेवारी 2024 मध्ये वार्षिक 100 टक्क्यांच्या वाढीची नोंद केली. टीपीईएम 70 टक्क्यांहून अधिक बाजारपेठ हिस्सासह या झपाट्याने विकसित होणाऱ्या विभागात भरारी घेत आहे.
Tata Tiago EV ऑक्टोबर 2022 मध्ये 8.49 लाख (एक्स-शोरूम) च्या किंमतीत लॉन्च करण्यात आली होती. Tata Tiago EV मध्ये दोन बॅटरी पॅक पर्याय आहेत. पहिल्यामध्ये 24 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक आहे ज्याची MIDC श्रेणी 315 किमी आहे. दुसरा पर्याय 19.2 kWh क्षमतेच्या बॅटरी पॅकसह येते जी 250 किमीची श्रेणी आहे.
इतर महत्वाच्या बातम्या