(Source: ECI/ABP News/ABP Majha)
TATA Cars : टाटा कारवर बंपर डिस्काउंट! Tata Tiago ते Tata Safari पर्यंत यादीत समावेश
Tata Motors Discount Offers : जून महिन्यात, टाटा मोटर्स आपल्या काही निवडक कारच्या खरेदीवर ग्राहकांना मोठ्या प्रमाणात सूट देत आहे.
Tata Motors Discount Offers : जून महिन्यात, टाटा मोटर्स आपल्या काही निवडक कारच्या खरेदीवर ग्राहकांना मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. सफारी, हॅरियर, नेक्सॉन, टियागो आणि टिगोर सारख्या टाटा मोटर्सच्या मॉडेल्सवर तुम्हाला आकर्षक सवलत मिळेल. भारतातील सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलायचे झाल्यास, प्रसिद्ध ऑटोमेकर टाटा मोटर्स ही टॉप 2 कार उत्पादकांपैकी एक आहे. त्याच्या यशाचे कारण म्हणजे Nexon Sub-Compact SUV सारखे मॉडेल, जे पेट्रोल आणि डिझेल इंजिन तसेच ELECTRIC VARIENT मध्ये दिसतात.
टाटा मोटर्सने अलीकडेच Tigor iCNG मॉडेल्ससह CNG विभागातील कार तयार करण्याच्या प्रक्रियेत प्रवेश केला आहे. टाटा पंच किंवा अल्ट्रोझ प्रीमियम हॅचबॅक सारखी काही लोकप्रिय मॉडेल्स या महिन्याच्या टाटा कारच्या यादीत समाविष्ट नाहीत.
या SUV वर सर्वाधिक सवलत पाहता, तुम्हाला टाटा हॅरियरवर सर्वाधिक सवलत मिळेल, जी 45,000 रुपयांपर्यंत आहे, या ऑफरमध्ये 5000 ची कॉर्पोरेट सूट आणि उर्वरित एक्सचेंज बोनस समाविष्ट आहे. Tata Safari बद्दल सांगायचे तर, तुम्हाला एक्सचेंज बोनस म्हणून त्यावर 40,000 पर्यंत सूट मिळते.
Tiago आणि Tigor वर डिस्काउंट - Tiago Hatchback आणि Tigor Sub Compact sedans बद्दल बोलायचे झाले तर, त्यावर ₹ 23000 ची सूट मिळत आहे. यामध्ये, तुम्हाला रोख सवलत आणि प्रत्येकी ₹ 10000 चे एक्सचेंज बोनस तसेच कॉर्पोरेट सवलतीच्या रूपात अतिरिक्त ₹ 3000 ची सूट मिळेल.
Nexon वर फक्त Rs 5000 ची सूट- Tata Nexon subcompact XUV, टाटा मोटर्सची सर्वाधिक विक्री होणारी SUV, फक्त ₹ 5000 ची सूट मिळत आहे. टाटाने त्यांच्या कोणत्याही इलेक्ट्रिक किंवा सीएनजी वाहनांवर अधिकृतपणे कोणतीही सूट दिलेली नाही. तसेच, तुम्हाला Nexon EV, Nexon EV Max आणि Tigor EV सारख्या काही मॉडेल्सवर कोणतीही सूट मिळणार नाही.
महत्वाच्या बातम्या :