एक्स्प्लोर

चीनी कार कंपनी BYD भारतात लॉन्च करणार इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Chinese Electric Car: आगामी काळात भारतीय ऑटोमोबाईल बाजार इलेक्ट्रिक वाहनांसाठी मोठी बाजारपेठ बनणार आहे. अशा परिस्थितीत केवळ देशीच नव्हे तर विदेशी इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांनाही भारतात आपली पकड मजबूत करायची आहे.

Chinese Electric Car: आगामी काळात भारतीय ऑटोमोबाईल बाजार इलेक्ट्रिक वाहनांसाठी मोठी बाजारपेठ बनणार आहे. अशा परिस्थितीत केवळ देशीच नव्हे तर विदेशी इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांनाही भारतात आपली पकड मजबूत करायची आहे. यामुळे चिनी कार निर्माता BYD (Build Your Dreams) आपली BYD Atto 3 इलेक्ट्रिक कारसह भारतीय बाजारात एंट्री करणार आहे.

ही कार चीनमध्ये गेल्या फेब्रुवारी 2022 मध्ये लॉन्च झाली होती. ही इलेक्ट्रिक SUV जानेवारीमध्ये 2023 ऑटो एक्सपोमध्ये लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. या कारची उत्पादक कंपनी BYD ने 2017 मध्ये इलेक्ट्रिक बसेससह व्यावसायिक विभागात पदार्पण केले होते. यानंतर नोव्हेंबर 2021 मध्ये कंपनीने बाजारात फ्लीट सेगमेंटमध्ये आपली इलेक्ट्रिक MPV BYD e6 लॉन्च केली होती. आता BYD Atto 3 सह बाजारात उतरण्याच्या तयारीत आहे. भारतीय बाजारपेठेत लॉन्च झाल्यानंतर ही कार बाजारात सध्या असलेल्या MG ZS EV शी थेट स्पर्धा करेल.

या कारची लांबी 4,455 मिमी, रुंदी 1,875 मिमी आहे आणि तिचा व्हीलबेस 2,720 मिमी आहे. BYD Atto 3 ही अत्यंत आरामदायी कार असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. यासोबतच ही एक पॉवरफुल कार आहे. BYD Atto 3 ची परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर 204 Bhp पॉवर आणि 310 Nm पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की, ही कार फक्त 7.3 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग पकडते. हिचे वजन 1,680-1,750 किलो दरम्यान आहे. BYD Atto 3 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दोन बॅटरी पॅकच्या पर्यायासह उपलब्ध आहे, ज्यामध्ये 49.92kWh आणि 60.48kWh बॅटरी पॅकचा समावेश आहे. हे बॅटरी पॅक या कारला अनुक्रमे 320 किमी आणि 420 किमीची WLTP रेंज देतात. BYD Atto 3 कंपनीचे पेटंट ब्लेड बॅटरी तंत्रज्ञान वापरते आहे. जे इतर बॅटरी तंत्रज्ञानापेक्षा प्रतिकूल परिस्थितीत सुरक्षित आणि अधिक क्षमाशील असल्याचा दावा केला जातो.

या कारच्या आंतरराष्ट्रीय आवृत्तीच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात एलईडी हेडलॅम्प, 18-इंच अलॉय व्हील, पॅनोरॅमिक सनरूफ, पॉवर्ड फ्रंट सीट्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 12.8-इंच रोटेटिंग टचस्क्रीन, इलेक्ट्रिक टेल गेट आणि अॅम्बियंट लाइटिंग सारखे फीचर्स देण्यात आले आहे. तज्ज्ञांच्या मते, या कारची प्रारंभिक किंमत 30 लाख रुपयांच्या दरम्यान असेल.

फीचर्स आणि किंमत 

या कारच्या आंतरराष्ट्रीय आवृत्तीच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात एलईडी हेडलॅम्प, 18-इंच अलॉय व्हील, पॅनोरॅमिक सनरूफ, पॉवर्ड फ्रंट सीट्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 12.8-इंच रोटेटिंग टचस्क्रीन, इलेक्ट्रिक टेल गेट आणि अॅम्बियंट लाइटिंग सारखे फीचर्स देण्यात आले आहे. सेफ्टी फीचर्समध्ये यात सात एअरबॅग्ज, ईएसपी, हिल डिसेंट कंट्रोल, 360 डिग्री कॅमेरा आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special ReportChay Wale Baba |  41 वर्षांपासून मौनव्रत, चायवाल्या बाबाची महाकुंभ मेळ्यात चर्चा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Kolhapur Crime : 5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
Embed widget