10 हजार भरून घरी घेऊन Honda Activa, जाणून घ्या किती असेल मासिक हप्ता
सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या स्कूटर्समध्ये अॅक्टिव्हाचे वर्चस्व
Honda Activa Loan EMI Down Payment: भारतात मोठ्या संख्येने स्कूटरची विक्री होते. या सेगमेंटमध्ये होंडाच्या अॅक्टिव्हाने बराच काळ मार्केटवर वर्चस्व गाजवले आहे. सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या स्कूटर्समध्ये अॅक्टिव्हाचे वर्चस्व कायम आहे. खूप कमी रक्कम भरून तुम्ही ही स्कूटर फायनान्सवर घरी आणू शकता. जर तुम्ही स्वतःसाठी चांगल्या स्कूटरच्या शोधात असाल, तर आम्ही तुम्हाला Honda Activa 6G, Honda Activa STD आणि Honda Activa DLX च्या दोन सर्वोत्तम मॉडेल्सवर उपलब्ध कर्ज, डाउनपेमेंट आणि EMI संबंधित सर्व महत्त्वाच्या माहितीबद्दल सांगणार आहोत.
Honda Activa 6G चे STD प्रकार 71,432 रुपये (एक्स-शोरूम) च्या किंमतसह बाजारात उपलब्ध आहे. तर Activa 6G DLX व्हेरिएंटची किंमत 73,177 रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही Honda स्कूटर 109.51cc इंजिनसह येते. जी 7.79 PS पॉवर आणि 8.79 Nm टॉर्क जनरेट करते. Activa मध्ये तुम्हाला 55 kmpl मायलेज मिळेल. उत्कृष्ट डिझाइन आणि जबरदस्त फीचर्ससह या स्कूटरला बाजारात सर्वाधिक मागणी आहे.
Honda Activa 6G STD कर्ज आणि EMI तपशील
Honda Activa 6G STD व्हेरियंटची ऑन-रोड किंमत सुमारे 83,225 रुपये आहे. परंतु तुम्ही फक्त 10,000 रुपयांच्या (ऑन-रोड तसेच प्रक्रिया शुल्क आणि मासिक कर्जासह) डाउनपेमेंट करून ही स्कूटर घरी आणू शकता. ज्यामध्ये तुम्हाला या स्कूटरवर 73,225 रुपये कर्ज मिळेल. जर तुम्हाला तीन वर्षांत परतफेड करायची असेल, तर तुम्हाला 9.7% व्याज दराने 36 महिन्यांसाठी दरमहा 2352 रुपये हप्ता भरावा लागेल.
Honda Activa 6G च्या DLX व्हेरियंटची किंमत 73,177 रुपये (एक्स-शोरूम) आहे. याची अंदाजित ऑन-रोड किंमत 85,129 रुपये आहे. जर तुम्हाला ही स्कूटर लोनवर घ्यायची असेल, तर Bike Dekho च्या EMI कॅल्क्युलेटरनुसार तुम्ही 10,000 रुपये डाउन पेमेंट करून फायनान्स करू शकता. यासाठी तुम्हाला 9.7% व्याजदराने 36 महिन्यांसाठी 75,129 रुपये कर्ज मिळेल. तसेच तुम्हाला 2,414 चा हप्ता बसेल.