Discount On Maruti Cars : : मारुतीच्या Nexa कारवर बंपर ऑफर्स; किमान लाखभर रुपये डिस्काऊंट!
Discount On Maruti Cars : मारुती सुझुकीच्या प्रीमियम रिलेट आउटलेट नेक्साच्या माध्यमाने जानेवारीमध्ये जिमनी, फ्रोंक्स, बलेनो, ग्रॅंड विटारा, सियाज आणि इंग्निस यांच्यावर ऑफर जाहीर केले आहेत.
Discount On Maruti Cars : मारुती सुझुकीच्या प्रीमियम रिलेट आउटलेट नेक्साच्या माध्यमाने जानेवारीमध्ये जिमनी, फ्रोंक्स, बलेनो, ग्रॅंड विटारा, सियाज आणि इंग्निस यांच्यावर ऑफर जाहीर केले आहेत. 2023 मध्ये तयार केलेल्या गाड्या 2024 मध्ये तयार झालेल्या मॉडेल्सच्या तुलनेने जास्त सवलतीवर विकल्या जात आहेत. चला तर जाणून घेऊया या बंपर ऑफर्स...
मारुती सुझुकी जिमनी (Maruti Suzuki Jimny)
2023 मारुती जिमनीच्या अल्फा वेरिएंटवर 1.55 लाख रुपये एवढे सवलत मिळत आहे. तर Zeta व्हेरियंटवर 55,000 रुपयांची सवलत मिळणार आहे. जर तुम्ही एसयुव्ही चे 2024 चे मॉडेल खरेदी करणार असाल तर या दोन्ही व्हेरिएंट वर जवळजवळ तुम्हाला 5000 रुपये सवलत मिळणार आहे. हे एक ऑफ-रोड एसयूव्ही आहे मात्र जास्त किंमत असल्याने अनेकजण ही जीप खरेदी करताना विचार करताना दिसत आहे.
मारुती सुझुकी इग्निस (Maruti Suzuki Ignis)
मारुती सुझुकी इग्निस मॅन्युअलच्या 2023 मॉडेलवर 62000 रुपये सवलत मिळत आहे. तर ऑटोमॅटिक व्हेरिएंट वर 52000 रुपये एवढे सवलत मिळत आहे. 2024 मॉडेलच्या मॅन्युअल ट्रान्समिशन वेरियंट वर 52 हजार रुपयेपर्यंत सवलत मिळत आहेत. तर ऑटोमॅटिक व्हेरिएंट वर 47 हजार रुपये एवढी सूट मिळत आहे. इग्निस 1.2 पेट्रोल इंजिनने लैस आहे. जे 83 hp आणि 113 Nm ला आउटपुट जनरेट करते.
मारुती सुझुकी सियाज ( Maruti Suzuki Ciaz)
मारुती सुझुकी सियाज मिड साइज सेडान ॉचे इंटीरियर जुनेच आहे. मात्र त्याचे पेट्रोल इंजिन खूप चांगले आहे. याची स्पर्धा स्कोडा स्लाविया, फॉक्सवॅगन वर्टस, होंडा सिटी आणि हुंडई वर्ना सोबत होते आहे. 2023 मध्ये तयार केलेले सियाज मॉडेल यावर 55 हजार रुपये सवलत मिळेल असा अंदाज वर्तवला जात आहे. 2024 मध्ये तयार केलेले मॉडेल यावर 35 हजार रुपये सवलत मिळू शकतो.
मारुती सुझुकी बलेनो (Maruti Suzuki Baleno)
मारुती सुझुकी बलेनो पेट्रोल आणि सीएनजी पावरट्रेन सोबत उपलब्ध आहे. 2023 मध्ये तयार केलेले पेट्रोल मॉडेल यावर 47 हजार रुपये तसेच सीएनजी व्हेरिएंट वर 32 हजार रुपयेपर्यंत सवलत मिळत आहेत. 2024 मध्ये तयार केलेल्या मॉडेलच्या पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही व्हेरिएंटवर 32000 इथपर्यंत डिस्काउंट मिळू शकतेो
मारुती ग्रँड विटारा (Maruti Grand Vitara)
मारुतीच्या मिड साईज एसयूव्ही ग्रँड विटाराच्या डेल्टा , जेटा आणि अल्फा व्हेरिएंट (हायब्रीड सहित) 2023 च्या मॉडेलवर 35 हजार रुपयेपर्यंत बेनिफिट दिला जात आहे. तसेच 2024 मध्ये आलेल्या सारख्याच मॉडेलला 20 हजार रुपयेपर्यंत डिस्काउंट मिळत आहे.
मारुती सुझुकी फ्रोंक्स (Maruti Suzuki Fronx)
मारुती सुझुकी फ्रॉंक्स 2023 मध्ये लॉंच केली होती. बाजारामध्ये या गाडीला भरपूर जास्त मागणी होती. मारुती आता 2023च्या टर्बो पेट्रोल व्हेरिएंट वर 30 हजार रुपये तर पेट्रोल व्हेरिएंटवर 10 हजार रुपयेपर्यंत डिस्काउंट देत आहे. मात्र याच्या सीएनजी व्हेरिएंटवर अद्याप कोणतीही सवलत दिली जात नाही आहे.
इतर महत्वाची बातमी-
Maruti Suzuki : 'ही' आहे भारतात मिळणारी सर्वात स्वस्त कार; बेस मॉडेलची किंमत 4 लाखांहून कमी