Royal Enfield: भारतानंतर 'या' देशात होते रॉयल एनफिल्डची सर्वाधिक विक्री! थायलंड, कोलंबिया आणि अर्जेंटिनामध्ये ही आहे कंपनीचे ग्राहक
Royal Enfield Brazil: प्रसिद्ध दुचाकी उत्तपादक कंपनी रॉयल एनफिल्डला भारतात मोठी मागणी आहे. देशातील तरुणांमध्ये या बाईकची एक वेगळीच क्रेझ आहे. कंपनीच्या बाईकची भारतात सर्वाधिक विक्री होते.
Royal Enfield Brazil: प्रसिद्ध दुचाकी उत्तपादक कंपनी रॉयल एनफिल्डला (Royal Enfield Bike Price) भारतात मोठी मागणी आहे. देशातील तरुणांमध्ये या बाईकची एक वेगळीच क्रेझ आहे. कंपनीच्या बाईकची भारतात सर्वाधिक विक्री होते. मात्र भारतनंतर या बाईकची सर्वाधिक विक्री ही ब्राझील मध्ये होते. यातच रॉयल एनफिल्डने ब्राझीलमधील (Royal Enfield Upcoming Bikes) आपल्या नवीन प्लांटमध्ये भारताबाहेरील बाजारपेठेचा विस्तार करत काम सुरू केले आहे. लॅटिन अमेरिकन देश ब्राझीलमध्ये कंपनीचा हा पहिला प्लांट आहे. या प्लांटद्वारे कंपनी आपली उत्पादने ब्राझील तसेच इतर दक्षिण अमेरिकन बाजारपेठेत पुरवेल.
भारतातून पुरवली जातात सेमी-फिनिश वाहने
नवीन रॉयल एनफील्ड (Royal Enfield Bike Price) सुविधा Amazonas ची राजधानी Manaus येथे आहे. थायलंड, कोलंबिया आणि अर्जेंटिना नंतर रॉयल एनफिल्डचे ((Royal Enfield Bike) हे चौथे असेंब्ली युनिट आहे. नवीन असेंब्ली युनिटमध्ये कंपनी भारतातून सेमी-फिनिश वाहने (CKD) पुरवेल. याशिवाय कंपनी भारताकडून अत्याधुनिक उत्पादन आणि सहायक सुविधांचीही मदत घेणार आहे.
ब्राझीलमधील कंपनीच्या असेंब्ली प्लांटमध्ये वार्षिक 15,000 पेक्षा जास्त वाहने तयार करण्याची क्षमता असेल. या प्लांटमधील असेंब्ली लाइन भारतात विकल्या जाणार्या सर्व मॉडेल्सचे एकत्रीकरण करेल. यामध्ये नवीन क्लासिक 350, मेटिअर 350, हिमालयन आणि 650 सीसी इंटरसेप्टर आणि कॉन्टिनेंटल जीटी सारख्या बाईकक्सचा समावेश आहे.
रॉयल एनफिल्डने (Royal Enfield Bike Price in India 2022) दिलेल्या माहितीनुसार, ब्राझील ही कंपनीसाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे. कंपनीने 2017 मध्ये ब्राझीलमध्ये प्रवेश केला. रॉयल एनफिल्ड दक्षिण अमेरिकन बाजारपेठेतील मिडलवेट बाईक्सच्या पहिल्या पाच उत्पादकांमध्ये सामील झाली आहे. कंपनी कोलंबिया (Colombia), मेक्सिको (Mexico), उत्तर अमेरिका (North America), ब्राझील (Brazil ) आणि अर्जेंटिना (Argentina) सारख्या बाजारपेठांमध्ये बाईक विकत आहे. नवीन असेंब्ली प्लांटच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना, रॉयल एनफिल्डचे सीईओ बी गोविंदराजनम्हणाले की, रॉयल एनफिल्ड जगभरात मध्यम वजनाचे बाईक सेगमेंट विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम करत आहे. कंपनी अमेरिका, युरोप आणि आशिया-पॅसिफिकमध्ये मजबूत स्थितीत आहे.
कंपनीने योजनेनुसार थायलंड, अर्जेंटिना आणि कोलंबिया या लॅटिन अमेरिकन देशांमध्ये असेंब्ली सुविधा उभारल्या आहेत. ब्राझील ही रॉयल एनफिल्डसाठी खूप मोठी बाजारपेठ आहे आणि लवकरच भारताबाहेर कंपनीची दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ बनणार आहे. ब्राझीलमध्ये 2019 पासून कंपनीची 100% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.
इतर ऑटो संबंधित बातम्या:
BMW S1000RR बाईक नवीन अवतारात भारतात लॉन्च, इतक्या किंमतीत खरेदी करू शकता Mahindra XUV 700