Prawaas 3.0 Exhibition: अधिक सुरक्षित आणि आधुनिक, टाटा मोटर्सने सादर केले नेक्स्ट जनरेशन प्रवासी वाहन
Prawaas 3.0 Exhibition: हैदराबाद येथे आयोजित केलेल्या प्रवास 3.0 वाहन प्रदर्शनात आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने आपले नेक्स्ट जनरेशन प्रवासी वाहन सादर केले आहेत.
Prawaas 3.0 Exhibition: हैदराबाद येथे आयोजित केलेल्या प्रवास 3.0 वाहन प्रदर्शनात आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने आपले नेक्स्ट जनरेशन प्रवासी वाहन सादर केले आहेत. हैदराबादमध्ये 5 आणि 6 ऑगस्ट 2022 रोजी आयोजित या प्रदर्शनात टाटा मोटर्सने आपल्या नवीन प्रवासी व्यावसायिक वाहनांचे प्रदर्शन केले. प्रवास 3.0 वाहन प्रदर्शनाची यंदाची थीम ही "सुरक्षित, स्मार्ट आणि शाश्वत प्रवासी वाहतुकीच्या दिशेने" (Towards Safe, Smart and Sustainable Passenger Mobility) होती. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांच्या हस्ते झाले.
प्रवास 3.0 वाहन प्रदर्शनीत टाटा मोटर्सने इंट्रासिटी आणि लक्झरी प्रवासासाठी भारतातील पहिले फ्रंट इंजिन 13.5-मीटर बस मॅग्ना स्लीपर कोच सादर केले. टाटाने प्रदर्शनातील पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनांमध्ये व्यावसायिक कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी डिझाइन केलेली 9/9 अल्ट्रा इलेक्ट्रिक बस, 913 लाँग रेंज सीएनजी बस आणि एलपीओ 10.2 सीएनजी एसी स्कूल बस सादर केली.
Ashok Leyland ने आधुनिक 13.5 मीटर बस चेसिस केली लॉन्च
कार ऑपरेटर कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया (BOCI) द्वारे आयोजित प्रवास 3.0 मध्ये व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी Ashok Leyland ने आपली नवीन आणि आधुनिक 13.5 मीटर बस चेसिस लॉन्च केली आहे. 13.5 मीटर इंटरसिटी बस चेसिस (4X2) हे एक नवीन प्लॅटफॉर्म आहे. जे टॉप व्हेलॉसिटी इंटरसिटी प्रवासासाठी तयार करण्यात आले आहे. कंपनीच्या या बसमध्ये 36 स्लीपर बर्थ आहेत.
दरम्यान, BOCI ने आयोजित केलेले प्रवास 3.0 मध्ये भारतातील 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांमधून 10,000 व्यावसायिक सहभागी झाले होते. या प्रवासी आणि व्यावसायिक वाहन प्रदर्शनामध्ये Ashok Leyland, टाटा मोटर्स, VE कमर्शियल, रेड बस सारख्या वाहन चालक-उत्पादक कंपनीने सहभाग घेतला. भारतात वाहन क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनींना एकत्रित आणण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतं. यंदाच्या प्रवास 3.0 मधून वाहन सेफ्टी आणि इलेक्ट्रिक वाहनांना अधिक चालना देण्यावर भर देण्यात आला.
महत्वाच्या बातम्या :
- Royal Enfield : दमदार फिचर्स घेऊन लवकरच बाजारात येणार Hunter 350; पाहा फर्स्ट लूक
- Car : Kia Sonet कंपनीकडून चाहत्यांना धक्का; सलग दुसऱ्यांदा वाढली कारची किंमत
- TVS घेऊन येत आहे हायड्रोजनवर धावणारी स्कूटर, जाणून घ्या संपूर्ण माहिती