एक्स्प्लोर

आता कार चार्ज करण्यासाठी घ्यावे लागेल वेगळे वीज कनेक्शन; घरगुती कनेक्शनचा वापर केल्यास होणार कारवाई

Madhya Pradesh News: एकीकडे सरकार पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे, तर दुसरीकडे ही वाहने वापरणाऱ्यांना कडक इशारेही देण्यात आले आहेत.

Madhya Pradesh News: एकीकडे सरकार पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे, तर दुसरीकडे ही वाहने वापरणाऱ्यांना कडक इशारेही देण्यात आले आहेत. घरगुती वीज जोडणीवरून इलेक्ट्रिक वाहन चार्ज होत असल्याचे आढळून आल्यास वीजचोरीचा गुन्हा दाखल करून ते वाहनही जप्त केले जाईल. याशिवाय दंडात्मक कारवाईही होणार आहे. विशेष म्हणजे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे इलेक्ट्रिक वाहनांकडे लोकांचा कल झपाट्याने वाढत आहे. ई-रिक्षासोबतच इलेक्ट्रिक स्कूटर, कारही बाजारात येत आहे. त्यांची मागणीही झपाट्याने वाढत आहे. लोकांची निवड लक्षात घेऊन इलेक्ट्रिक वाहने बनवणाऱ्या कंपन्याही नवनवीन शोध लावत आहेत. या सर्व प्रकारात वीज विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

अशातच मध्य प्रदेश सरकारने इलेक्ट्रिक कार मालकांना कडक इशारा देत इलेक्ट्रिक वाहने चार्ज करण्यासाठी वेगळे वीज कनेक्शन घ्यावे लागेल, असे स्पष्टपणे सांगितले आहे. इलेक्ट्रिक वाहनाचा उपयोग करणाऱ्यांनी घरगुती वीजचा वापर कार चार्ज करण्यासाठी केला तर विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 च्या उपकलम 2 नुसार वाहन जप्त करून कठोर कारवाई केली जाईल, असे मध्य प्रदेश सरकारने सांगितलं आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी वीज दरही वीज नियामक आयोगाने स्वतंत्रपणे निश्चित केले आहेत.

भोपाळमध्ये करण्यात आली पहिली कारवाई 

भोपाळमध्ये वीज कंपनीने काही दिवसांपूर्वी वीजचोरीचा गुन्हा दाखल केला असून त्यात रईसा बी, शहनाज, नाझिया हकीम यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आरोपींच्या नावावर ई-रिक्षा घेण्यात आल्या असून त्यांनी आपल्या ई-रिक्षाची बॅटरी चार्ज करण्यासाठी घरगुती वीज कनेक्शनचा वापर केला, म्हणून त्यांच्यावर वीजचोरीचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात बॅटरी चार्जरसह इतर साहित्य जप्त करण्यात आले. याशिवाय रईसा बीवर 45 हजार, शहनाजला 44 हजार, नाझियावर 40 हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Tata Tiago: टाटाने आपल्या सर्वात स्वस्त कारच्या किंमतीत केली वाढ; जाणून घ्या मॉडेल आणि किंमत

Upcoming Electric Cars: भारतात लवकरच लॉन्च होणार 'या' तीन नवीन इलेक्ट्रिक कार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget