Year Ender 2022 : मारूती सुझुकीपासून ते टोयोटापर्यंत 'या' आहेत 2022 वर्षातील सर्वात जास्त इंधन असलेल्या कार; पाहा संपूर्ण यादी
Fuel Efficient Cars : नवीन 2022 मधील Toyota Glanza मध्ये 1.2 लिटर 4-सिलेंडर DualJet K12N पेट्रोल इंजिन आहे.
Fuel Efficient Cars : सध्या बाजारात जवळपास प्रत्येक प्रकारच्या कारला विशेष मागणी आहे. नवीन कार खरेदी करताना ग्राहक तिचा लूक, फीचर्स, स्पेस आणि किंमत या सगळ्याच गोष्टींची काळजी घेतात. मात्र, कार खरेदी करताना आणखी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली जाते आणि ती म्हणजे त्या कारचे मायलेज. महागड्या इंधनामुळे ग्राहक आता जास्त मायलेज देणाऱ्या गाड्यांना जास्त महत्त्व देऊ लागले आहेत. या ठिकाणी आम्ही तुम्हाला अशाच काही सर्वात जास्त इंधन कार्यक्षमता असणाऱ्या कारबद्दल माहिती सांगणार आहोत.
मारुती सुझुकी सेलेरियो
मारुती सुझुकीची दुसरी जनरेशन सेलेरियो ही देशातील सर्वात जास्त इंधन कार्यक्षम कार आहे. त्याचे VXi AMT व्हेरिएंट सर्वाधिक 26.68 kmpl चा मायलेज देते. त्याच्या ZXi आणि ZXi+ AMT व्हेरिएंटना 26 kmpl चा मायलेज मिळतो. तसेच, त्याचे ZXi+ मॅन्युअल व्हेरिएंट 24.97 kmpl चे मायलेज देखील देते. दिल्लीच्या एक्स-शोरूममध्ये या कारची किंमत 5.15 लाख ते 6.94 लाख रुपये आहे.
होंडा सिटी ई-एचईव्ही
Honda City चे e-HEV व्हेरिएंट या वर्षाच्या सुरुवातीला लाँच करण्यात आले होते. याला एक पॉवरफुल हायब्रिड पॉवरट्रेन मिळते. कारला हायब्रिड टेक्नॉलॉजीसह 1.5L नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन मिळते. ही कार 26.68 kmpl चा मायलेज देते. दिल्लीत या कारची एक्स-शोरूम किंमत 19.92 लाख रुपये आहे.
सुझुकी वॅगन आर
मारुती सुझुकी वॅगन आरमध्ये 1.0-लीटर पेट्रोल इंजिन आणि 1.2-लीटर पेट्रोल इंजिनचा पर्याय आहे. यामध्ये पहिल्या इंजिनला 25.19 kmpl आणि 24.43 kmpl चा मायलेज मिळतो. त्याच्या CNG व्हेरिएंटला 34.04 किमी/किलो मायलेज मिळते. या कारची एक्स-शोरूम किंमत 5.45 लाख ते 7.08 लाख रुपये आहे.
सुझुकी डिझायर (Maruti Suzuki Dzire) :
मारुती सुझुकी डिझायरला स्टार्ट-स्टॉप फंक्शनसह 1.2-लीटर K12N पेट्रोल इंजिन मिळते. या कारचे मायलेज AMT व्हेरिएंटमध्ये 24.12 kmpl आणि मॅन्युअल व्हेरिएंटमध्ये 23.26 kmpl आहे. दिल्लीमध्ये या कारची एक्स-शोरूम किंमत 6.24 लाख ते 9.18 लाख रुपये आहे.
टोयोटा ग्लान्झा
नवीन 2022 मधील Toyota Glanza मध्ये 1.2-liter 4-सिलेंडर DualJet K12N पेट्रोल इंजिन आहे. या कारच्या मॅन्युअल ट्रान्समिशनला ARAI प्रमाणित मायलेज 22.35 kmpl आणि AMT ट्रान्समिशन व्हेरियंटला 22.94 kmpl जास्त मायलेज मिळते. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 6.49 लाख रुपये आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Upcoming MPV Cars: 2023 ऑटो एक्स्पोमध्ये अनेक MPV कार होणार लॉन्च, मात्र 'ही' कार आहे बेस्ट