BattRE Storie इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च, एका चार्जमध्ये 130 किमी धावणार
BattRE Storie Electric Scooter: भारतीय बाजारात नवीन ई-स्कूटर BattRE Storie लाँच करण्यात आली आहे.
BattRE Storie Electric Scooter: भारतीय बाजारात नवीन ई-स्कूटर BattRE Storie लाँच करण्यात आली आहे. या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये तुम्हाला जबरदस्त लुक, उत्तम फीचर्स, उत्तम रेंज पाहायला मिळेल. इलेक्ट्रिक स्कूटरची भारतात वेगळीच क्रेझ आहे. सध्या बाजारात अनेक इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध आहेत. ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात उपलब्ध असलेल्या ओला, हिरो इलेक्ट्रिक, ओकिनावा, प्युअर ईव्ही आणि कोमाकी सारख्या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरशी स्पर्धा करेल. चला तर मग जाणून घेऊया नवीन BattRE Storie ई-स्कूटरची खासियत काय आहे.
BattRE Storie स्कूटरच्या रेंजबद्दल बोलायचे झाले, एका चार्जवर ही स्कूटर 130 किमी पर्यंत धावते. ही एक पॉवरफुल स्कूटर आहे. यात लुकास टीव्हीएस मोटर आणि कंट्रोलर देण्यात आला आहे. यासोबतच ही ई-स्कूटर AIS 156 Approved 3.1kWh बॅटरी पॅकने सुसज्ज आहे.
किंमत
BattRE Storie इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, भारतीय बाजारात ही स्कूटर 89,600 (एक्स-शोरूम) किंमतीसह उपलब्ध आहे. तसेच या स्कूटरवर ग्राहकांना फेम 2 सबसिडी दिली जात आहे. कंपनीने भारतात आतापर्यंत 30 हजारांहून अधिक इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या आहेत. तसेच ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच 300 शहरांमधील 400 डीलरशिपवर उपलब्ध होईल.
फीचर्स
या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ग्राहकांना ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, स्मार्ट स्पीडोमीटर, टर्न बाय टर्न नेव्हिगेशन, कॉल अलर्ट, कनेक्टेड ड्राइव्ह फीचर, मोठी सीट आणि फूटबोर्ड सारखे अनेक फीचर्स मिळणार आहे. कंपनीने ही एक खास कम्युटर इलेक्ट्रिक स्कूटर म्हणून लॉन्च केली आहे. ही नवीन स्कूटर दिसायलाही खूपच आकर्षक आहे. दरम्यान, यापूर्वी इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत, हे लक्षात घेऊन कंपनीने या स्कूटरमध्ये सेफ्टी फीचर्स आणि सर्व आवश्यक खबरदारी घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या :