Volvo XC40 : Volvo आपली पहिली इलेक्ट्रिक कार Volvo XC40 जुलैमध्ये करणार लॉन्च! जाणून घ्या फिचर्स
Volvo XC40 : ही व्होल्वो कार कॉम्पॅक्ट मॉड्युलर आर्किटेक्चर (CMA) प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. तुम्ही ही कार दोन इलेक्ट्रिक मोटर्ससह चालवू शकता.
Volvo XC40 : Volvo कार निर्माता भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक कार जुलै 2022 मध्ये लॉन्च करणार आहे, माहितीनुसार, ही नवीन इलेक्ट्रिक कार भारतात पूर्णपणे असेंबल केली जाईल. असे करणारी व्होल्वो ही पहिली लक्झरी कंपनी असेल. या व्होल्वो इलेक्ट्रिक कारचे असेंब्ली कर्नाटकातील बेंगळुरूजवळ होसाकोट येथे केले जाईल. त्याचे रिचार्ज XC40 चे उद्घाटन भारतात मार्च 2021 मध्ये करण्यात आले होते, ज्यासाठी मागील वर्षी जूनमध्येच प्री-बुकिंग सुरू करण्यात आली होती. त्याच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर, ही व्होल्वो कार कॉम्पॅक्ट मॉड्युलर आर्किटेक्चर (CMA) प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. तुम्ही ही कार दोन इलेक्ट्रिक मोटर्ससह चालवू शकता, ज्यामध्ये 408bhp आउटपुट आणि 660Nm पीक टॉर्क निर्माण करण्याची क्षमता आहे.
कार स्पीड आणि बॅटरी क्षमता : व्होल्वो कार इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक ज्योती मल्होत्रा यांनी सांगितले की, “आम्ही भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिककडे वाटचाल करण्यासाठी वचनबद्ध आहोत आणि आमची बेंगळुरूमध्ये XC40 रिचार्ज असेंबल करण्याची योजना करत आहोत. XC40 Volvo 78 kWh लिथियम आयन बॅटरीद्वारे समर्थित असेल, जी एकदा पूर्ण चार्ज केल्यावर तुम्हाला 400 किलोमीटरची रेंज देऊ शकते, कंपनीने दावा केला आहे की, ही नवीन कार 150 kW DC फास्ट चार्जरसह उपलब्ध असेल. व्होल्वो कंपनी भारतात XC40 रिचार्ज पुढील महिन्यात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे, तर या कारची डिलिव्हरी ऑक्टोबर 2022 मध्ये सुरू होईल.
2030 पर्यंत पूर्णपणे इलेक्ट्रिक कार कंपनी बनेल
कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, आम्ही 2030 पर्यंत पूर्णपणे इलेक्ट्रिक कार उत्पादक बनवू, कारण मोबिलिटीचे भविष्य इलेक्ट्रिक कार आहे. त्याच वेळी, कंपनीने पुढे म्हटले आहे की, पुढील महिन्यात लॉन्च होणाऱ्या XC40 रिचार्जनंतर, कंपनीचे लक्ष्य दरवर्षी नवीन इलेक्ट्रिक मॉडेल बाजारात आणण्याचे असेल.
महत्वाच्या बातम्या :