एक्स्प्लोर

ही कार स्वतःच शोधणार चार्जिंग स्टेशन, Mercedes Benz ची नवीन इलेक्ट्रिक कार उद्या होणार लॉन्च

Mercedes Electric Car: जर्मनीची लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज-बेंझ (Mercedes Benz) आपली इलेक्ट्रिक सेडान उद्या म्हणजेच 24 ऑगस्ट रोजी भारतात लॉन्च करणार आहे.

Mercedes Electric Car: जर्मनीची लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज-बेंझ (Mercedes Benz) आपली इलेक्ट्रिक सेडान उद्या म्हणजेच 24 ऑगस्ट रोजी भारतात लॉन्च करणार आहे. या कारचे नाव AMG EQS 53 4MATIC+ असेल. ज्यामध्ये EQ म्हणजे इलेक्ट्रिक पॉवरट्रेन असेल. त्यामुळे ही कार इलेक्ट्रिक परफॉर्मन्स राईड आणि स्पोर्टी असेल. AMG बॅजसह येणारी ही पहिली इलेक्ट्रिक कार असेल. कंपनीने यात अनेक नवीन फीचर्स दिले आहेत. ज्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. 

Mercedes Benz AMG EQS 53 4MATIC+ इलेक्ट्रिक संकल्पनेवर आधारित असेल. या EQS संकल्पनेवर कंपनी भविष्यात इतर अनेक कार तयार करू शकते. मर्सिडीजची आगामी एसयूव्ही, एसयूव्ही कूप, सेडान आणि कूप या मॉडेलवर आधारित असू शकतात.

या कारमध्ये कंपनी 107.8 kWh क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी पॅक देऊ शकते. या कारची रेंज 770 किमी पर्यंत असू शकते. या कारची बॅटरी विकसित करण्यासाठी मर्सिडीज-बेंझने ओव्हर द एअर (OTA) अपडेटला सपोर्ट करणारे सॉफ्टवेअर इन-हाउस विकसित केले आहे. कारचा आवाज आणि कंपन कमी करण्यासाठी समोरील ड्राइव्हट्रेनवर चार माउंटिंग वापरल्या जाऊ शकतात. ही कार 4WD च्या सुविधेसह येईल. कारला पुढच्या आणि मागील चाकांमध्ये 135 kW-255 kW चा पॉवर स्प्लिट मिळू शकतो. ही कार इंटेलिजेंट नेव्हिगेशन तसेच क्लाउड बेस्ड नेव्हिगेशन सिस्टमवर आधारित असेल. ज्याद्वारे तुम्ही तुमच्या जवळच्या चार्जिंग स्टेशनची माहिती अगदी सहज मिळवू शकता. ही कार स्टँडर्ड 22 kW चा चार्जर तसेच फास्ट चार्जरने चार्ज करता येते. यासोबतच या कारमध्ये अॅक्टिव्ह रिजन-ब्रेकिंग आणि ऑटोमॅटिक ब्रेकिंग असिस्ट देखील मिळेल.

फीचर्स 

बाजारात उपलब्ध असलेल्या इतर कारच्या तुलनेत या कारचा लूक खूपच वेगळा असेल. कारमध्ये कूप सारखी सिल्हूट आहे, ज्यात गोल आकाराचे 3D-हेलिक्स डिझाइन आहे. यात LED रीअर लाइट्स, अॅक्टिव्ह अॅम्बियंट लाइटिंग, 22 अलॉय व्हील्स, LED ल्युमिनेसेंट बँड फ्रंट आणि रिअर, फ्रंट कॅमेरा, MBUX, ब्लॅक पॅनल फ्रंट ग्रिल सारखी फीचर्स आहेत. मागच्या प्रवाशांसाठी स्क्रीन, टॅबलेट/स्क्रीनसह हायपरस्क्रीन मागील आर्मरेस्टमध्ये इतर फीचर्स मिळतील. याशिवाय यात कंट्रोल फ्रंट डॅशबोर्ड, पार्कट्रॉनिकसह अॅक्टिव्ह पार्किंग असिस्ट, ऑटोमॅटिक कम्फर्ट डोअर्स, 360° कॅमेरे, ड्युअल सनरूफ/मूनरूफ, मर्सिडीज-बेंझ पॅटर्नसह नवीन डिझाइन पार्किंग पॅकेज आणि मल्टीबीम एलईडी हेडलाइट्स दिले जातील.

किंमत 

एका अंदाजानुसार, Mercedes-Benz AMG EQS 53 4MATIC+ ची एक्स-शोरूम किंमत सुमारे 2.2-3 कोटी रुपये असू शकते. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

टोयोटाच्या 'या' कारसाठी करावी लागेल तब्बल 3 वर्ष प्रतीक्षा, बुकिंगची रक्कम जाणून व्हाल थक्क

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध

व्हिडीओ

Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण
Dhanashree Kolge vs Tajasvee GHosalkar : TV वरील चेहरा वि.रस्त्यावरील चेहरा, घोसाळकरांविरुद्ध रणशिंग
Ajit Pawar Beed : बजरंग बाप्पांनी 500 ची नोट दिली अजितदादांनी नाकारली? काय घडलं?
Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
Embed widget