![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
टोयोटाच्या 'या' कारसाठी करावी लागेल तब्बल 3 वर्ष प्रतीक्षा, बुकिंगची रक्कम जाणून व्हाल थक्क
Toyota Land Cruiser LC300: जपानची वाहन उप्तादक कंपनी टोयोटाची लँड क्रूझर (Land Cruiser) कार ही जगभरात प्रसिद्ध आहे. भारतीय आणि जागतिक बाजारपेठेत या कारला मोठी मागणी आहे.
![टोयोटाच्या 'या' कारसाठी करावी लागेल तब्बल 3 वर्ष प्रतीक्षा, बुकिंगची रक्कम जाणून व्हाल थक्क Toyota Land Cruiser LC300 New India Bookings Started With up-to 3 years waiting list, Check Price टोयोटाच्या 'या' कारसाठी करावी लागेल तब्बल 3 वर्ष प्रतीक्षा, बुकिंगची रक्कम जाणून व्हाल थक्क](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/22/3bb2e57841df1e0a3edd186b3617c98c1661169765629384_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Toyota Land Cruiser LC300: जपानची वाहन उप्तादक कंपनी टोयोटाची लँड क्रूझर (Land Cruiser) कार ही जगभरात प्रसिद्ध आहे. भारतीय आणि जागतिक बाजारपेठेत या कारला मोठी मागणी आहे. याची मागणी इतकी वाढली आहे की, यासाठी एक दोन नाही तर तब्बल तीन वर्ष ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. नेक्स्ट जनरेशन टोयोटा लँड क्रूझरने इतर जागतिक बाजारात पदार्पण केलं आहे. आता ही कार भारतात ही लाॅन्च केली जाऊ शकते. याच्या बुकिंगसाठी डीलर्स ग्राहकांकडे 10 लाख रुपये मागत आहे. जगातील इतर कार निर्मात्या कंपनीसोबतच टोयोटालाही सेमीकंडक्टर चिप तुटवड्याचा फटका बसला आहे. यामुळेच मोठी मागणी असतानाही ही कार अद्याप भारतात लॉन्च झाली नाही.
नवीन LC300 ही CBU पूर्णपणे आयात केलेली SUV असेल. यामध्ये भारतात वितरित केलेल्या कारचा डिलिव्हरी कालावधी हा तीन वर्ष असण्याची शक्यता कमी आहे. ग्राहक ही कार बुकिंग केव्हा करतो त्यानंतर हा कालावधी नेमका कळू शकतो. भारतात ही कार बुक केल्यानंतर ग्राहकांना ती एक वर्ष किंवा त्यापेक्षा कालावधीत डिलिव्हरी केली जाईल.
नेक्स्ट जनरेशन लँड क्रूझरला री-डिझाइन केलेले एक्सटीरियर प्लस इंटीरियर नवीन लुकसह फ्रंट-एंड आणि मागील स्टाइलिंगसह येईल. याचे इंटीरियर अधिक आधुनिक असेल. यात 12.3-इंचाच्या टचस्क्रीनसह प्रीमियम JBL ऑडिओ सिस्टम, हीटिंग/व्हेंटिलेटेड सीट्स, सनरूफ आणि कनेक्टेड कार टेक सारखे फीचर्स यात ग्राहकांना मिळतील. या नवीन कारमध्ये ग्राहकांना मोठी स्पेस मिळणार आहे. ज्यात ग्राहकांना अधिक कंफर्ट आणि आराम मिळणार आहे.
नवीन LC300 लँड क्रूझरमध्ये विना पेट्रोल 3.3-लीटर V6 डिझेल मिळेल. हे 10-स्पीड ऑटोमॅटिक स्टॅंडर्ड आहे. भारतात याची 5 सीटर कार लॉन्च करण्यात येणार आहे. तर जागतिक बाजारात याचे 7 सीटर व्हर्जन उपलब्ध आहे. SUV ला ऑफ-रोडिंगसाठी योग्य फोर व्हील ड्राइव्ह सिस्टीम देखील मिळते. यात चार कॅमेऱ्यांसह जमिनीवर देखरेख ठेवण्यासाठी ऑफ-रोडिंगसाठी मल्टी टेरेन कॅमेरा तंत्रज्ञान देखील देण्यात आले आहे. भारतात कंपनी ही कार 2 कोटींच्या प्रारंभिक किंमतीत लॉन्च करू शकते. भारतात ही कार Land Rover ला टक्कर देईल.
महत्वाच्या बातम्या :
- Tata Tiago XT Rhythm : नवीन फिचर्ससह Tata Tigor चा XT Rhythm व्हेरिएंट भारतात लॉन्च; किंमत फक्त 6.45 लाख रुपये
- Innova Crysta Diesel : टोयोटाने भारतात बंद केले इनोव्हा क्रिस्टा डिझेलचे बुकिंग; जाणून घ्या संपूर्ण माहिती
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)